KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 09:01 AM2020-12-09T09:01:37+5:302020-12-09T09:11:43+5:30
एक व्यक्ती शुक्रवारच्या कर्मवीर एपिसोडमध्ये येणार आहे. ही व्यक्ती आहे जगातली पहिली दिव्यांग गिर्यारोहक डॉ. अरूणिमा सिन्हा.
कौन बनेगा करोडपती १२व्या सीझनच्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये एकापेक्षा एक व्यक्ती सहभागी झाले होते. शोमध्ये त्यांचं येणं, प्रेक्षकांना आपल्या जीवनाचा दृष्टीकोन सांगणं, त्यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणदायी ठरला. अशीच एक व्यक्ती शुक्रवारच्या कर्मवीर एपिसोडमध्ये येणार आहे. ही व्यक्ती आहे जगातली पहिली दिव्यांग गिर्यारोहक डॉ. अरूणिमा सिन्हा.
डॉ. अरूणिमा सिन्हा या जगातल्या पहिल्या दिव्यांग महिला आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला. सोनी चॅनलने या आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये डॉ. अरूणिमा यांनी आपल्या जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी आणि सर्वात कठिण कार्याबाबत सांगितले.
त्यांनी सांगितले की, 'तुम्ही कधी विचार करू शकता की, एक अशी दिव्यांग व्यक्ती जी बेडवरून उठू शकत नव्हती. पण तिने जेव्हा तिने निश्चय केला की, वेगळं काही करायचं आहे तेव्हा तिला लोक वेडी म्हणू लागले होते. जेव्हा जगाने मला वेडी म्हणणं सुरू केलं होतं तेव्हा मला समजलं की, आपला गोल आपल्या फार जवळ आहे. तेव्हा मी ठरवलं की, मी तेच करणाच ज्याचा आतापर्यंत कुणी विचार केला नसेल'.
अमिताभ बच्चन यांनी डॉ. अरूणिममा यांच्या उपलब्धीबाबत सांगितले की, 'माउंट एव्हरेस्ट जगातलं सर्वात उंच शिखर गिर्यारोहकांसाठी एक कठिण आव्हान असतं. हा शिखर सर करणं सर्वांना शक्य होत नाही. मात्र, या कठिण शिखरावर अरूणिमाजी यांनी आपले गमावल्यावरही भारताचा ध्वज फडकावला. माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातली पहिली महिला दिव्यांग गिर्यारोहक, तेंजिंग नोर्गे अवॉर्डने सन्मानित, पद्मश्री डॉ. अरूणिमा सिन्हा यांचं अभिनंदन'.
शोमध्ये अरूणिमाने आपल्या रेल्वे अपघाताबाबतही सांगितले. त्या म्हणाल्या की, 'बरेलीजवळ चनेटी नावाचं एक छोटसं रेल्वे स्टेशन आहे. चार-पाच लोक कुठूनतरी रेल्वेत चढले होते. अचानक माझ्या गळ्यावर त्यांचा हात असल्याचं मला जाणवलं. तर मी त्यांचा हात पकडला आणि विरोध केला'.
'त्यांच्याकडे चाकू आणि बंदूक होत्या. त्यांनी मला उचललं आणि चालत्या रेल्वेतून बाहेर फेकलं. मी रेल्वेचं हॅडल पकडण्याचा प्रयत्न केला, पण पकडू शकले नाही. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेचा लाइट मला दिसला. मी अचानक बाहेर होते आणि खाली पडले. मी हाताच्या आधाराने उठण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. माझ्या डाव्या पायांची हाडे मोडून जीन्सबाहेर आली होती'.
अरूणिमा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय कसा घेतला आणि ही प्रेरणा त्यांना कशी मिळाली याबाबत सांगितले की, 'हॉस्पिटलच्या बेडवर असताना पेपरचं फ्रन्ट पेज पाहिलं त्यावर लिहिलं होतं की, अरूणिमाकडे तिकीट नव्हतं आणि टीटीला बघून तिने रेल्वेतून उडी घेतली. दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरमध्ये वाचलं की, अरूणिमा आत्महत्येसाठी गेली होती'.
'ते पान पलटवलं आणि स्पोर्ट्स पानावर माउंटेनिअरिंगचं एक आर्टिकल होतं. मी त्यात माउंटेनिअरिंगबाबत वाचलं आणि नंतर मनात ठरवलं की, ज्या कापलेल्या पायाला लोक अरूणिमाची कमजोरी समजतात, त्यालाच मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं शस्त्र बनवणार'.