राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात कोण-कोण? पाहा त्यांचा Family फोटो'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:43 PM2022-09-21T12:43:21+5:302022-09-21T14:18:58+5:30

राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कधी-कधी तो सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे फोटो शेअर करायचे.

know about Raju Shrivastav family kids wife all facts unseen photos | राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात कोण-कोण? पाहा त्यांचा Family फोटो'

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात कोण-कोण? पाहा त्यांचा Family फोटो'

googlenewsNext

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा एक तारा आज निखळला. कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे आज निधन झालं.. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ५८ वर्षीय राजू श्रीवास्तव यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजूच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. जाणून घ्या राजू यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत.


राजू यांच्या कुटुंबात कोण कोण आहे?
राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. राजू यांच्या पत्नीचं नाव शिखा श्रीवास्तव आहे. त्या गृहिणी आहेत. राजू आणि शिखा यांना दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. राजू यांची मुलगी अंतरा सहाय्यक दिग्दर्शक आहे.  अंतरा इन्स्टावर खूप सक्रिय आहे. अंतराचे २८.४ हजार फॉलोअर्स आहेत. त्यांचा मुलगा शिक्षण घेत आहे. राजू यांचा मुलगा आयुष्मान श्रीवास्तव हा सितार वादक आहे. आयुष्मानने 'बुक माय शो'च्या नई उडान या शोमध्ये काम केले आहे.

राजू यांना पाच भाऊ आणि एक बहीण आहे. राजू आपली फॅमिली लाईफ नेहमीच जीवन खाजगी ठेवत असे. कधी-कधी तो सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असे. राजू श्रीवास्तव आपल्या दोनही मुलांचा खूप जवळ होते. 

मुलीला मिळालाय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
2006 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. तिने घरात शिरलेल्या दोन चोरांपासून आपल्या आईला वाचवलं होतं.अंतराने 2013 साली फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंटमध्ये असिस्टंट प्रोड्यूसर व डायरेक्टर म्हणून काम करायला सुरूवात केली. मॅक प्रॉडक्शनसाठीही तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं.असिस्टंट प्रोड्यूसर व डायरेक्टर म्हणून तिने फुल्लू, पलटन, द जॉब, पटाखा, स्पीड डायल अशा अनेक चित्रपटांसाठी काम केलं.

 राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला.  मुंबईत आल्यानंतर राजू छोट्या छोट्या भूमिका करत होते. या वेळी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' सुरू झाले, ज्यामध्ये राजू श्रीवास्तव यांनीही सहभाग घेतला. शोमधील त्याची कॉमेडी आवडली आणि हा शो नंतर त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या शोमध्ये तो 'गजोधर' या व्यक्तिरेखेने ते घरोघरी पोहोचले.

Web Title: know about Raju Shrivastav family kids wife all facts unseen photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.