'अग्गंबाई सासूबाई' वरुन सुचलंय 'आई कुठे काय करते' मालिकेचं नाव?; तुम्हाला माहितीये का हे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 11:54 AM2022-01-06T11:54:12+5:302022-01-06T11:55:06+5:30

Aai kuthe kay karte: मालिकांच्या गर्दीत अशा काही सिरिअल्स असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर ठाम राज्य करतात. यातल्याच दोन मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई' आणि अलिकडेच सुरु झालेली 'आई कुठे काय करते'.

marathi tv serial aai kuthe kay karte and aggbai sasubai connection | 'अग्गंबाई सासूबाई' वरुन सुचलंय 'आई कुठे काय करते' मालिकेचं नाव?; तुम्हाला माहितीये का हे खास कनेक्शन

'अग्गंबाई सासूबाई' वरुन सुचलंय 'आई कुठे काय करते' मालिकेचं नाव?; तुम्हाला माहितीये का हे खास कनेक्शन

googlenewsNext

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या मालिकांच्या गर्दीत अशा काही सिरिअल्स असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर ठाम राज्य करतात. यातल्याच दोन मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई' (aagbai sasubai) आणि अलिकडेच सुरु झालेली 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या दोन्ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. विशेष म्हणजे टीआरपीमध्येही त्या अव्वल असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकांमध्ये एक कनेक्शन असल्याचं सांगण्यात येतं.

एका पोर्टलनुसार, अग्गंबाई सासूबाई आणि आई कुठे काय करते या मालिकांचा जवळचा संबंध आहे. विशेष म्हणजे अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील एका संवादावरच आई कुठे काय करते या मालिकेचं नाव ठरवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. अग्गंबाई सासूबाई या मालिकेत शुभ्रा आणि आसावरी यांच्यावर एक सीन चित्रीत करण्यात आला आहे. या सीनमध्ये शुभ्रा आईचं महत्त्व पटवून देते. विशेष म्हणजे याच सीनवर आधारित आई कुठे काय करते या मालिकेचं टायटल ठरल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, आई कुठे काय करते ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेत अनेक नवनवीन रंजक वळण येत असून मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टींग होत आहे. सध्या या मालिकेत देशमुख कुटुंबात अभि आणि अनघाच्या लग्नाची धावपळ असल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: marathi tv serial aai kuthe kay karte and aggbai sasubai connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.