Bigg boss marathi: सुबोध भावेमुळे होणार घरात राडा? नव्या टास्कमुळे स्पर्धकांची उडणार तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 11:19 IST2021-12-03T11:18:35+5:302021-12-03T11:19:23+5:30
Bigg boss marathi 3: बीबी हाऊसमध्ये सुबोध भावेच्या येण्यामुळे घरात नवा राडा होणार असल्याचं दिसून येत आहे.

Bigg boss marathi: सुबोध भावेमुळे होणार घरात राडा? नव्या टास्कमुळे स्पर्धकांची उडणार तारांबळ
छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस मराठी (Bigg boss marathi). यंदा या शोचं तिसरं पर्व सुरु असून घरातील प्रत्येक टास्क त्याच्या वेगळेपणामुळे चर्चेत येत आहे. आतापर्यंत या घरात अनेक टास्क रंगले असून या खेळात अनेकदा स्पर्धकांचे एकमेकांशी वादविवादही झाले आहेत. विशेष म्हणजे घरातील स्पर्धकांना एकमेकांशी भांडण्यासाठी लहानसं कारणंही पुरेसं असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता या बीबी हाऊसमध्ये अभिनेता सुबोध भावे (subodh bhave) आणि पूजा सावंत (pooja sawant) येणार आहेत. मात्र, सुबोधच्या येण्यामुळे घरात नवा राडा होणार असल्याचं दिसून येत आहे.
आतापर्यंत बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटी स्टार्सने हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी या शो मध्ये बिग बॉसचे माजी स्पर्धक शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता अभिनेता सुबोध भावे आणि पूजा सावंत येणार आहेत. या दोन्ही कलाकारांना पाहिल्यावर बिग बॉसच्या घरातील स्पर्धक चांगलाच आनंद होतो. परंतु, त्यानंतर सुबोधने दिलेल्या टास्कमुळे सगळ्यांचीच तारांबळ उडते.
आजच्या भागात बीबी हाऊसमध्ये सुबोध घरातील स्पर्धकांना एक भन्नाट टास्क देणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना डोळ्यांवर पट्टी बांधून दिलेलं कार्य पार पाडायचं आहे. मात्र, हे कार्य घरातील स्पर्धक कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोबतच सुबोधच्या या कार्यामुळे घरात नवे राडे होतात की नाही हे पाहण्याची ओढ आता प्रेक्षकांना लागली आहे.