तिसऱ्या पत्नीशी घटस्फोटाच्या चर्चांवर राहुल महाजनने सोडलं मौन, म्हणाला, “माझ्या आयुष्यात...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 04:33 PM2023-07-31T16:33:54+5:302023-07-31T16:34:12+5:30

आधी दोन घटस्फोट आणि आता तिसऱ्यांदा मोडणार संसार? राहुल महाजन प्रतिक्रिया देत म्हणाला...

Rahul Mahajan breaks silence on getting divorce with third wife nataliya ileana | तिसऱ्या पत्नीशी घटस्फोटाच्या चर्चांवर राहुल महाजनने सोडलं मौन, म्हणाला, “माझ्या आयुष्यात...”

तिसऱ्या पत्नीशी घटस्फोटाच्या चर्चांवर राहुल महाजनने सोडलं मौन, म्हणाला, “माझ्या आयुष्यात...”

googlenewsNext

‘बिग बॉस’ फेम राहुल महाजन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राहुल त्याची पत्नी नतालिया इलियानाबरोबर घटस्फोट घेण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याआधी दोनदा राहुलचा संसार मोडला आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा त्याचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर राहुलने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल महाजनने २०१८ साली रशियन असलेल्या नतालिया इलियानाबरोबर लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच त्याच्या संसारात वादळ आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राहुल आणि त्याची पत्नी नतालिया यांच्या नात्यात दुरावा आला असून त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिसऱ्यांदा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांवर राहुल महाजनने इंडिया टुडेशी बोलताना भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. “माझं आयुष्य मला वैयक्तिक ठेवायचं आहे. मला कोणत्याही गोष्टीबद्दल भाष्य करायचं नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललं आहे, याबाबत मला कोणाबरोबरही काहीही शेअर करायचं नाही. माझ्या मित्रांबरोबरही मला याबाबत बोलायचं नाही,” असं राहुल म्हणाला.

“दारू पिणे ही मोठी चूक”, रजनीकांत यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, “नशेत रात्री दोन वाजता...”

राहुल आणि नतालियामध्ये सुरुवातीपासूनच मतभेद होते. तरीही, दोघांनीही संसार टिकवण्याचा प्रयत्न केला होता. अखेर गेल्यावर्षी दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू लागले. त्यांनी गेल्याच वर्षी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचीही माहिती आहे. पण, त्यांचा घटस्फोट झाला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

“वडील गेल्यानंतर त्या १३ दिवसांत...”, रवींद्र महाजनींबद्दलच्या चाहत्याच्या प्रश्नाला गश्मीरचं सडेतोड उत्तर

राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे. यापूर्वी त्याचे दोन संसार मोडले आहेत. राहुलने २००६ साली बालमैत्रीण श्वेता सिंहशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ‘राहुल का स्वयंवर’ या शोमधून त्याने २०१० साली डिंपी गांगुलीबरोबर विवाह केला. २०१३ साली त्यांचा घटस्फोट झाला. राहुलच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नींनी त्याच्यावर हिंसाचाराचे आरोप केले होते.

Web Title: Rahul Mahajan breaks silence on getting divorce with third wife nataliya ileana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.