'..तर मालिकेत काम करु नका'; चित्रपटातील कामासोबत तुलना करणाऱ्यांवर श्रेयस नाराज

By शर्वरी जोशी | Published: September 26, 2021 04:33 PM2021-09-26T16:33:04+5:302021-09-26T16:33:41+5:30

Shreyas talpade: चित्रपट असो किंवा मालिका मी त्याच ताकदीने, त्याच जिद्दीने आणि उत्साहाने प्रत्येक काम करत असतो.

Shreyas talpade is upset with those who compare movies and tv show work | '..तर मालिकेत काम करु नका'; चित्रपटातील कामासोबत तुलना करणाऱ्यांवर श्रेयस नाराज

'..तर मालिकेत काम करु नका'; चित्रपटातील कामासोबत तुलना करणाऱ्यांवर श्रेयस नाराज

googlenewsNext
ठळक मुद्देही मालिका कमी कालावधीत टीआरपीच्या शर्यतीत प्रथम स्थानावर जाऊन पोहोचल्याचं म्हटलं जातं.

छोट्या पडद्यावर सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका तुफान लोकप्रिय होत आहे. त्यामुळेच ही मालिका कमी कालावधीत टीआरपीच्या शर्यतीत प्रथम स्थानावर जाऊन पोहोचल्याचं म्हटलं जातं. या मालिकेत श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि बालकलाकार मायरा वायकुळ स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळेच या तिघांची जोडीही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडून होत असलेला कौतुकाचा वर्षाव पाहून श्रेयसने सगळ्यांचे आभार मानात या मालिकेत येण्याचा निर्णय का घेतला ते सांगितलं.

मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूड गाजवून आलेला अभिनेता श्रेयस तळपदे सध्या प्रेक्षकांना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत पाहायला मिळत आहे. उत्तम अभिनयशैली आणि मालिकेचं कथानक या दोहोंच्या जोरावर ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे कमी कालावधीत ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेच्या माध्यमातून श्रेयसने जवळपास १७ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा मालिकाविश्वात परतल्यावर चित्रीकरणाच्या पद्धतीमध्ये झालेला बदल त्याला कशाप्रकारे जाणवतो हे त्याने 'लोकमत ऑनलाइन'शी बोलताना सांगितलं.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेविषयी बोलत असताना श्रेयसने अनेक गोष्टींचा खुलासा केला. सोबतच काही न खटकणाऱ्या गोष्टींवर भाष्यदेखील केलं.  यामध्येच मालिका व चित्रपट या दोन्ही माध्यमांमधील काम करण्याच्या पद्धतीमध्ये तुलना करणाऱ्यांनाही त्याने सुनावलं आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचं चित्रीकरण कुठे सुरू आहे माहितीये का?

"मालिका माझ्यासाठी नवीन नाहीत. कारण, नाटक, एकांकिका आणि मालिका असा प्रवास करुनच मी चित्रपटांकडे वळलो आहे. त्यामुळे मग या सगळ्यांना विसरुन कसं काय चालेल?  चित्रपट असो किंवा मालिका मी त्याच ताकदीने, त्याच जिद्दीने आणि उत्साहाने प्रत्येक काम करत असतो. त्यामुळे मालिकेतच काम करायचं म्हणून मग तिकडे चित्रपटापेक्षा कमी काम करायचं किंवा कमी उत्साहात काम करायचं असं होतं नाही. आणि, जर मालिकांमध्ये कमी उत्साहात किंवा मनापासून काम करायचं नसेल तर मग ते करुच नका. जे काम करायचं आहे तिकडे सारखीच मेहनत आणि जिद्दीने काम करा", असं श्रेयस म्हणाला.

श्रेयस तळपदेची रिअल लाईफ परी कोण माहितीये का? पाहा त्याच्या लेकीचे फोटो

पुढे तो म्हणतो,  "मी यापूर्वीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मालिकांच्या सेटवरचं शेड्युल कसं असतं याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच, चित्रपट किंवा मालिका या दोन्ही ठिकाणी काम करताना मला भेद किंवा फरक जाणवत नाही".

दरम्यान,या मालिकेमध्ये श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि बालकलाकार मायरा वायकुळदेखील झळकले आहेत. या तिघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवड असून या मालिकेवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मालिकेव्यतिरिक्त श्रेयस अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. यात ‘इक्बाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ आणि ‘हाउसफुल’ या चित्रपटांचा समावेश आहे. 
 

Web Title: Shreyas talpade is upset with those who compare movies and tv show work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.