लव्ह लग्न लोचा या मालिकेने गाठला ४०० एपिसोड्सचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 04:22 AM2018-02-12T04:22:13+5:302018-02-12T09:52:13+5:30
झी युवा वाहिनीवरील लव्ह लग्न लोचा या लोकप्रिय मालिकेने ४०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्यामुळे या मालिकेची संपूर्ण टीम ...
झ युवा वाहिनीवरील लव्ह लग्न लोचा या लोकप्रिय मालिकेने ४०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्यामुळे या मालिकेची संपूर्ण टीम अतिशय आनंदी आहे. त्यांनी हा आनंद केक कापून नुकताच साजरा केला. यावेळी रुचिता जाधव (काव्या), सिद्धी कारखानीस (शाल्मली), समीहा सुळे (आकांक्षा), सक्षम कुलकर्णी (विनय नागपूरकर), श्रीकर पित्रे (अभिमान) आणि विवेक सांगळे (राघव) हे कलाकार तसेच दिग्दर्शक सचिन गोखले आणि निर्माते विद्याधर पठारे उपस्थित होते.
या मालिकेच्या चित्रीकरणाच्या आठवणी जाग्या करताना राघवची भूमिका साकारणारा विवेक सांगळे सांगतो, “लव्ह लग्न लोचाचे ४०० एपिसोड झाले आहेत आणि मालिकेने मिळवलेल्या यशाने मला अतिशय आनंद होत आहे. आम्ही पहिल्यांदा चित्रीकरणाला सुरुवात केली त्याला खूप कालावधी उलटून गेला आहे. आता संपूर्ण टीमचे एकमेकांशी खास बंध निर्माण झाले आहेत आणि जेव्हा आम्ही सेटवर एकत्र येतो तेव्हा खूप मजा करतो. आम्ही एकमेकांची चेष्टा करतो, जेवण देखील आम्ही एकत्र जेवतो. आतापर्यंतचा प्रवास अतिशय चांगला होता. यापुढे देखील आम्ही असेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहू याची मला खात्री आहे.” लव्ह लग्न लोचा या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी रुचिता जाधव सांगते, “लव्ह लग्न लोच्याच्या सेटवर जाण्यासाठी मी जेव्हा घरातून निघते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक हास्य असते. कारण तो सेट म्हणजे माझे दुसरे घरच बनले आहे आणि तेथील प्रत्येक जण माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे झाला आहे.
प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलेला सक्षम कुलकर्णी सांगतो, “प्रेक्षकांना आमची मालिका आणि माझी विनय ही भूमिका आवडली त्यासाठी मी माझ्या फॅन्सचा आभारी आहे.” श्रीकांतची भूमिका साकारणारा समीर खांडेकर सांगतो, “लव्ह लग्न लोच्यासाठी आम्हाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही अतिशय भारावून गेलो आहोत. आता तर प्रेक्षकांशी आमचा एक खास ऋणानुबंध निर्माण झाला आहे. हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राला इतके सारे प्रेम आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत.”
Also Read : लव्ह लग्न लोचा फेम सिद्धी कारखानीसचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिला का?