Taarak Mehta च्या 'या' अभिनेत्याला ओळखलंत का? रिअल लाइफमध्ये आहे जेठालालसोबत खास कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:43 PM2021-09-27T12:43:20+5:302021-09-27T13:01:31+5:30
Sharad sankla: ही कलाकार मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात अनेकदा ते त्यांच्या जीवनातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात.
छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळेच मालिकेसोबत यातील कलाकारांनीदेखील प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे चाहते करत असलेलं प्रेम पाहून ही कलाकार मंडळीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात अनेकदा ते त्यांच्या जीवनातील काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. त्यातच मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने त्याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांना त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. इतकंच नाही तर जेठालाल म्हणजेच अभिनेता दिलीप जोशीसोबत त्याचं खास नातं असल्याचंही समोर आलं आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत अभिनेता शरद सांकला यांनी अब्दल ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अब्दुल या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले शरद एकेकाळी चार्ली चॅप्लिन या कॅरेक्टरसाठी फेमस होते. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारली होती.
चित्रपटासाठी वजन वाढवणं कंगनाला पडलं महागात; निर्माण झाल्या शारीरिक समस्या
चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात
'तारक मेहता का..' मालिका करण्यापूर्वी शरद यांनी अनेक वर्ष चार्ली चॅप्लिनची भूमिका वठवली होती. त्यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'बाजीगर' या चित्रपटात त्यांनी प्रथम चार्ली चॅप्लिनची भूमिका केली होती. तेव्हापासून त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीनही शेअर केली आहे.
जेठालालसोबत आहे हे खास कनेक्शन
शरद यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्यासोबत सुरु केली आहे. तारक मेहता का पूर्वी त्यांनी 'कभी ये कभी वो' या कॉमेडी शोमध्येही एकत्र काम केलं आहे.