'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं': मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर सुरु आहे मालिकेचं शुटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 05:07 PM2021-10-12T17:07:12+5:302021-10-12T17:07:54+5:30
tuzya mazya sansarala ani kay hava: आदर्श कुटुंबाची खरी व्याख्या उलगडणारी मालिका म्हणजे 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'. अलिकडेच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.
आदर्श कुटुंबाची खरी व्याख्या उलगडणारी मालिका म्हणजे 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'. अलिकडेच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, अवघ्या काही भागांमध्येच या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरली. आदिती आणि सिद्धार्थप्रमाणेच या मालिकेतील मोठी बाई ही भूमिका प्रचंड गाजत आहे. अभिनेत्री अंजली जोशी यांनीही भूमिका साकारली असून त्यांच्या रिल आणि रिअल लाइफमधील साम्य त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी या मालिकेचं चित्रीकरण कुठे सुरु आहे हे देखील सांगितलं आहे.
"मालिकेत दाखवल्याप्रमाणे मी खऱ्या आयुष्यातदेखील मोठी घरात मोठी सून आहे. माझ्या लग्नानंतर वर्षभरातच घरात दोन धाकट्या जावा आला. त्यामुळे घरात सासू-सासरे, मी, नवरा, दोन दीर, दोन जावा असा मोठा परिवार आहे. आम्ही सगळे एकत्रच राहत होतो. या मालिकेप्रमाणेच माझ्या खऱ्या आयुष्यातही तितकंच प्रेमळ कुटुंब आहे. आमच्या सगळ्या जावांचं वय जवळपास सारखंच असल्यामुळे आमच्यात बॉण्डिंग चांगलं आहे, असं अंजली जोशी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, पुढे आमची मुलं मोठी झाली आणि जागेअभावी आम्ही वेगळे रहायला लागलो. पण सणवार, वाढदिवस या सगळ्या दिवशी आम्ही एकत्र जमतो. त्यामुळे अजूनही मला एकत्र कुटुंबात राहिल्याप्रमाणेच वाटतं.
"सेटवर सुद्धा आमची खूप धमाल सुरु असते. मालिकेतील सगळेच कलाकार मला मोठ्या बाई म्हणतात. आमच्या देशमुखांच्या सुनांचे अर्ध्याहून जास्त सीन किचनमध्ये शूट झाले आहेत. त्यामुळे या किचनसोबत एक वेगळाच लळा लागला आहे. एकदा याच किचनमध्ये आम्ही सगळ्या युनिटसाठी शिरा सुद्धा केला होता. सध्या आमच्या मालिकेचं चित्रीकरण नाशिकमध्ये सुरु आहे. यात अनेक जण नाशिकच्या बाहेरुन आले आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र राहतांना कोणालाही कुटुंबाची आठवण येणार नाही याची काळजी घेतो. आणि, एका कुटुंबासारखंच एकमेकांना सांभाळून गुण्यागोविंदाने राहतो", असंही अंजली यांनी सांगितलं.
दरम्यान, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत झळकला आहे. तर अमृता पवारने आदितीची भूमिका साकारली आहे.