Tunisha Sharma: सुसाईड नोट सापडली नाही, दोन्ही बाजूने तपास करणार; घटनास्थळी उपस्थितांचीही चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 09:17 PM2022-12-24T21:17:41+5:302022-12-24T21:20:01+5:30

Tunisha Sharma: सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी तुनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

TV actress Tunisha Sharma death case Police will investigate it from the angle of both murder and suicide. | Tunisha Sharma: सुसाईड नोट सापडली नाही, दोन्ही बाजूने तपास करणार; घटनास्थळी उपस्थितांचीही चौकशी सुरु

Tunisha Sharma: सुसाईड नोट सापडली नाही, दोन्ही बाजूने तपास करणार; घटनास्थळी उपस्थितांचीही चौकशी सुरु

googlenewsNext

मुंबई- हिंदी सिरीयलची प्रसिद्ध अभिनेत्री तुनीषा शर्मा (२४) हिने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी कारणावरून नायगावच्या रामदेव स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दास्ताने काबुल या सिरीयलमधील मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होती. तिच्या या आत्महत्येमूळे सिरीयल क्षेत्रात खळबळ व शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ती शनिवारी सिरीयलच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. नंतर तिच्या सहकाऱ्यांनी तिला बोलावण्यासाठी गेले व दरवाजा ठोठावला. पण तिने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडण्यात आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे पाहून सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. तिला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले पण तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

मेकअप करताना स्टोरी शेअर केली; मग शूटिंग सुरु असताना आत्महत्या, नेमकं काय घडलं?

सदर प्रकरणाबाबत खून आणि आत्महत्या या दोन्ही बाजूने पोलीस तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची पोलीस चौकशी करत असल्याची माहिती वालीव पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली.

सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी तुनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी तुनिषाने शेअर केली होती. त्यानंतर याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. तुनीषा शर्माचे कोणत्या अभिनेत्यासोबत अफेअर किंवा काही वाद झाल्याचे सूत्रांकडून कळत आहे. 

तुनिषा शर्माचा जन्म ४ जानेवारी २००२ रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या १४व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: TV actress Tunisha Sharma death case Police will investigate it from the angle of both murder and suicide.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.