"माझी वनी आयुष्यभर...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:14 IST2023-07-19T15:14:01+5:302023-07-19T15:14:25+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचा आज वाढदिवस आहे.

"माझी वनी आयुष्यभर...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात हिचा आज वाढदिवस आहे. उत्तम अभिनय आणि अफलातून कॉमेडीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या वनिताने सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. कोळीवाड्याची रेखा अशी ओळख मिळवलेल्या वनिताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. वनिताच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने खास व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वनिताबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. "हॅपी बर्थडे माझी वनी आयुष्यभर अशीच हसत रहा...उत्तम अभिनेत्री... माझी लाडकी... आमचा laughter डोस आणि अत्यंत खरी," असं नम्रताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. नम्रताच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी वनिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वनितानेही नम्रताच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 'लव्ह यू ताई' अशी कमेंट वनिताने नम्रताच्या पोस्टवर केली आहे.
'कबीर सिंग'मधील वनिता खरातचं काम पाहून भारावलेला शाहीद कपूर, म्हणालेला...
वनिताने अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाची छाप पाडली. 'कबीर सिंग' या बॉलिवूड चित्रपटात वनिता झळकली होती. बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरबरोबर तिने स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील वनिताच्या कामाचं कौतुकही करण्यात आलं होतं.
Video : अमेरिकेतील लक्झरियस हॉटेलमध्ये थांबले आहेत हास्यजत्रेचे कलाकार, समीर चौघुलेंनी दाखवली झलक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून वनिता प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. सध्या वनिता हास्यजत्रेच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस वनिता हास्यजत्रेच्या टीमबरोबर अमेरिकेत साजरा करणार आहे.