बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:23 IST2023-02-28T15:22:26+5:302023-02-28T15:23:49+5:30
आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे.

बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि पत्नी शिवानी रांगोळे(Shivani Rangole) या क्युट कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे.
विराजस आणि शिवानी गेल्या वर्षी ३ मे रोजी लग्नबंधनात अडकले. दोघांची कॉलेजमध्ये असताना एका नाटकात काम करताना ओळख झाली होती. दरम्यान शिवानीने याच आठवणी ताज्या करणारी पोस्ट शेअर केली आहे. शिवानी लिहिते, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा विराजस! एकमेकांची वाक्य पूर्ण करण्यापासून ते एकमेकांसोबत जेवणाचा आस्वाद घेण्यापर्यंत...! अनाथेमा या पहिल्या नाटकापासून ते व्हिक्टोरिया या पहिल्या दिग्दर्शित सिनेमापर्यंत तुझ्या या प्रवासाचा मी भाग बनले याचा मला आनंद आहे. हे तुझं वर्ष आहे, असाच राहा!'
शिवानीने या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या व्हिडिओत तिने घेतलेला उखाणाही फारच इंटरेस्टिंग आहे. शिवानी म्हणते, 'खास मेजवानीचा शेवट केला खाऊन स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि आईस्क्रीम केक, खास मेजवानीचा शेवट केला खाऊन स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि आईस्क्रीम केक, मध्येच विराजस म्हणाला, 'शिवानीचं नाव घेतो आमचं काहीच नाही फेक.'
बायकोचा उखाणा नवरा पूर्ण करतो असं क्वचितच घडलं असेल. या नवरा बायकोचा उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.