Roger Federer donates : Russia vs Ukraine युद्धामुळे बाधीत झालेल्या मुलांच्या मदतीसाठी धावला रॉजर फेडरर, केली ३ कोटी ८० लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:23 PM2022-03-19T12:23:28+5:302022-03-19T12:23:57+5:30

रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळील थिएटरवर हवाई हल्ला केला. या थिएटरमध्ये सुमारे १००० लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात २१ जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे.

20 time Grand slam champion Roger Federer donates half a million to supports Ukrainian Kids | Roger Federer donates : Russia vs Ukraine युद्धामुळे बाधीत झालेल्या मुलांच्या मदतीसाठी धावला रॉजर फेडरर, केली ३ कोटी ८० लाखांची मदत

Roger Federer donates : Russia vs Ukraine युद्धामुळे बाधीत झालेल्या मुलांच्या मदतीसाठी धावला रॉजर फेडरर, केली ३ कोटी ८० लाखांची मदत

Next

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध २४व्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याच्या चर्चेला अद्याप यश आलेले नाही. याचदरम्यान पुन्हा एकदा रशियाने युक्रेनचे दुसरे मोठे शहर खारकीव्हमध्ये काल हवाई हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनवरील लष्करी हल्ले थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला. गुरुवारी रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश स्वीकारण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी एक आदेश देत रशियाला युक्रेनवरील हल्ले त्वरित थांबवण्यास सांगितले होते. या सर्व युद्धजन्य परिस्थितीत अनेकजण आता युक्रेनसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत.

२० ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडरर  ( Roger Federer ) यानं मनाचा मोठेपणा दाखवताना युक्रेनमधील मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी ५ लाख डॉलर एवढी मोठी रक्कम दान केली आहे. रॉजर फेडरर फाऊंडेशनने ही मदत केली आहे आणि भारतीय रक्कमेनुसार ती ३ कोटी ८० लाखांची मदत केली आहे. यू. एन. रेफ्यूजी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमधून ३ मिलियन रेफ्यूजिंना बाहेर काढण्यात आले आहे. युक्रेनच्या एकूण लोकसंखेच्या ७ टक्के रेफ्यूजिंची संख्या आहे. फेडरर म्हणाला,''युक्रेन येथील फोटो पाहून मला व माझ्या कुटुंबीयांना खूप वेदना झाल्या. निष्पाप लोकांना या भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत.''

सध्या ६ मिनियन मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे आणि या परिस्थिती त्यांना मदतीची खरी गरज आहे. त्यामुळेच रॉजर फेडरर फाऊंडेशनने  War Child Holland च्या मदतीने ५ लाख डॉलर जान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे फेडररने सांगितले. UNICEF UKचा सदिच्छादूत असलेल्या अँडी मरे ( Andy Murray) यानेही २०२२मध्ये जिंकलेल्या स्पर्धेतील रक्कम ही या मुलांसाठी दान केली होती.   

Web Title: 20 time Grand slam champion Roger Federer donates half a million to supports Ukrainian Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.