ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले. ही आग आटोक्यात आणण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं पीडितांना मदत करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे आणि आता त्यात टेनिसपटूंचाही समावेश झाला आहे. दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी सामाजिक भान राखताना पुनर्वसनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
''जवळपास दोन ते अडीच तास चालणाऱ्या या सामन्यातून आम्ही जास्तीतजास्त निधी गोळा करणार आहोत. सामाजिक भान राखून आम्ही सर्व एकत्र येत आहोत,'' असे टेनिस ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी क्रेग टिली यांनी सांगितले.