Australia Open 2023 Stefanos Tsitsipas vs Novak Djokovic : नोव्हाक जोकोव्हिचनेऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकले. त्याने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासवर विजय मिळवताना २२वे ग्रँड स्लॅम जिंकले. राफेल नदाल याच्यानंतर २२ ग्रँड स्लॅम जिंकणारा तो दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला. शारीरिक तंदुरुस्तीची कसोटी पाहणाऱ्या या फायनलमध्ये त्सित्सिपासने सर्बियन स्टारला जवळपास तीन तास झुंजवले. नोव्हाकने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी उचलली. नोव्हाकने ६-३, ७-६ ( ७-४), ७-६ ( ७-५) अशी बाजी मारली.
राफेल नदालचे आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे नोव्हाक जोकोव्हिच यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकेल हे स्पष्ट होते. ग्रीसचा २४ वर्षीय स्टेफानोस त्सित्सिपास आणि सर्बियाच्या नोव्हाक यांच्यातल्या सामना चुरशीचा झाला. त्सित्सिपासने २०१९, २०२१ व २०२२च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि यंदा त्याने एक पाऊल पुढे टाकले. जागतिक क्रमवारीत त्सित्सिपास चौथ्या क्रमांकावर आहे, तर नोव्हाक पाचव्या स्थानी आहे. तरीही अनुभवाच्या जोरावर नोव्हाकने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ग्रीसच्या खेळाडूने माजी विजेत्याचा घाम काढला. टाय ब्रेकरमध्ये रंगलेल्या या सेटमध्ये नोव्हाक व त्सित्सिपास यांच्यात रॅलीचा चांगला खेळ पाहायला मिळाला. नोव्हाकने हा सेट ७-६ ( ७-४) असा जिंकून २-० अशी आघाडी घेतली.
प्रेक्षकांचा उत्साह प्रचंड वाढलेला पाहायला मिळाला अन् चेअर अम्पायरना त्यांना शांत बसण्याचे आवाहन करावे लागले. नोव्हाकने टायब्रेकरमध्ये सलग ३ गुण घेतले. ५-० अशी आघाडी असताना आता नोव्हाक गुण घेत बाजी मारेल असे वाटत असताना त्सित्सिपासने पहिला गुण घेतला. त्यानंतर चांगली रॅली सुरू असताना प्रेक्षकांकडून नोव्हाकची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न झाला अन् त्सित्सिपासला दुसरा गुण मिळाला. २६ फटक्यांची ही रॅली रंगली आणि या मॅचमधील ही सर्वात लांब चाललेली रॅली ठरली.
ग्रँड स्लॅम विजेतेपदऑस्ट्रेलियन ओपन - 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021, 2023 फ्रेंच ओपन - 2016, 2021विम्बल्डन - 2011, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022अमेरिकन ओपन - 2011, 2015, 2018