मेलबर्न : जगात नंबर वनवर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने (राफा) आपला जलवा कायम ठेवला. नदालने अर्जेंटिनाच्या लियोनार्डाे मायेरचा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयाबरोबरच त्याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसºया फेरीत धडक दिली. महिला गटात, एलिना स्वेतलाना पराभूत होण्यापासून वाचली. तिने दुसरी फेरी गाठली.नदालने सामन्यात केवळ एकदाच सर्व्हिस गमावली. त्याने हा सामना दोन तास आणि २८ मिनिटांत जिंकला. ६-३, ६-४ आणि ७-६ अशा फरकाने त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिसºया सेटमध्ये लियानार्डाे याने संघर्ष केला. मात्र, राफाने अनुभवाच्या बळावर त्याला जिंकण्याची संधी दिली नाही. आता त्याचा पुढील सामना २८ व्या मानांकित दामिर जुमहूर याच्याविरुद्ध होणार आहे.बेलिंडाचे आव्हान संपुष्टातआॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेत महिलांच्या पहिल्याच फेरीत अमेरिकेची दिग्गज व्हिनस विलियम्स हिला पराभवाचा धक्का देत खळबळ माजवणाºया स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनकिक हिचे आव्हान दुसºयाच फेरीत संपुष्टात आले. थायलंडच्या लुकसिका कुमखुम हिने तुफानी खेळ करताना बेलिंडाचा सरळ दोन सेटमध्ये ६-१, ६-३ असा फडशा पाडून सर्वांचे लक्ष वेधले.किर्गियोसला दंडआॅस्ट्रेलियाचा आक्रमक खेळाडू निक किर्गियोस याने पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांसाठी अर्वाच्च शब्दाचा वापर केला. त्यामुळे त्याला दंडाचा सामना करावा लागला. २२ वर्षीय किर्गियोसला ३ हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. त्याने ब्राझीलच्या रोझोरियो डिसिल्वा याचा ६-१, ६-२, ६-४ ने पराभव केला. जिंकल्यानंतर मात्र त्याची वर्तवणूक खेळाडूसारखी नव्हती. आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये दंडाचा फटका बसलेला तो सहावा खेळाडू ठरला.किताबाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाºया कॅरोलिन वोज्नियाकी आणि स्वेतलाना यांना उलटफेरचा बळी व्हावे लागले. नंबर वन खेळाडू वोज्नियाकी हिने बिनमानांकित सी क्रोएशियाच्या जाना फेटचा ३-६, ६-२, ७-५ ने पराभव केला. चौथी मानांकित स्वेतलाना हिने एक सेट गमावल्यानंतर चेक प्रजासत्ताकच्या कतरीना सिनियाकोव्हाचा ५-६, ६-२, ६-१ ने पराभव केला.
आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस : राफाचा विजय, स्वेतलाना वाचली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:41 AM