शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

चायना ओपन आजपासून : सायना, प्रणॉय चमकदार कामगिरीसाठी उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:43 AM

राष्ट्रीय चॅम्पियन सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धेत जेतेपद पटकावत दुबई सुपर सीरिज फायनल्ससाठी पात्रता मिळवण्यास उत्सुक आहेत.

फुजोऊ : राष्ट्रीय चॅम्पियन सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धेत जेतेपद पटकावत दुबई सुपर सीरिज फायनल्ससाठी पात्रता मिळवण्यास उत्सुक आहेत.जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू सायनाने आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा पराभव करीत गेल्या आठवड्यात तिसºयांदा राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. प्रणॉयने किदाम्बी श्रीकांतचा पराभव करीत प्रथमच राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.सायना व प्रणॉय हे दोन्ही खेळाडू डेस्टिनेशन दुबई रँकिंगमध्ये ११ व्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे पात्रता मिळवण्यासाठी केवळ दोन स्पर्धा चायना ओपन व हाँगकाँग ओपन शिल्लक आहेत. ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणाºया सायनाला सलामी लढतीत अमेरिकेच्या बेवेन झांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, तर प्रणॉय पहिल्या फेरीत क्वालिफायरसोबत खेळणार आहे.पुरुष विभागात बी. साई प्रणितची सलामीला डेन्मार्कच्या एंडर्स एंटोंसेनविरुद्ध गाठ पडणार आहे, तर अजय जयराम जपानच्या काजुमासा सकाईसोबत खेळेल. फिटनेसच्या कारणास्तव गेल्या दोन सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेणारा सौरभ व समीर वर्मा पुनरागमन करणार आहेत. सौरभची लढत फ्रान्सच्या ब्राईस लीव्हरदेजसोबत होईल तर समीर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला व गत चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनविरुद्ध खेळेल. दुहेरीमध्ये प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी यांची गाठ पाचवे मानांकनप्राप्त चीनच्या हुआंग याकियोंग व झेंग सिव्हेई यांच्यासोबत पडणार आहे. राष्ट्रीय चॅम्पियन अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी महिला दुहेरीमध्ये कोरियाच्या हा ना बायक व चाए यू जुंग यांच्याविरुद्ध खेळतील. पुरुष एकेरीमध्ये राष्टकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यपची गाठ पात्रता फेरीत चीनच्या गुओ केईविरुद्ध पडणार आहे. (वृत्तसंस्था)यंदाच्या मोसमात पाच स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारताना चार स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणाºया श्रीकांतने स्नायूच्या दुखापतीमुळे चायना ओपनमधून माघार घेतली आहे.इंडिया ओपन व कोरिया ओपन या स्पर्धांव्यतिरिक्त विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावणारी सिंधू राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. सिंधूला पहिल्या फेरीत जपानाच्या सायाका सातोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.सातोने यंदा इंडोनेशिया ओपनमध्ये जेतेपद पटकावले आहे. पहिल्या दोन फेरीचा अडथळा दूर केला तर तिसºया फेरीत सिंधूची गाठ जपानच्या नोजोमी ओकुहारासोबत पडू शकते. ओकुहाराने ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव केला होता.