शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

डेव्हिस चषक सामने पाकऐवजी तटस्थस्थळी हवेत - एआयटीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:51 AM

इस्लामाबाद येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी डेव्हिस चषकाचे सामने प्रस्तावित आहेत.

नवी दिल्ली: पाकिस्तानसोबतच्या संबंध विच्छेदाच्या पार्श्वभूमीवर अ.भा. टेनिस संघटनेला (एआयटीए) डेव्हिस चषक टेनिसचे आयोजन पाकिस्तानात नव्हे तर तटस्थस्थळी हवे आहे. इस्लामाबाद येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी डेव्हिस चषकाचे सामने प्रस्तावित आहेत.जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा केंद्र सरकारने काढल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी भारतासोबतचे राजकीय संबंध कमी केले.पाकिस्तानातील भारतीय राजदूताला देश सोडून जाण्यास सांगितले. गुरुवारी पाकने समझोता एक्स्प्रेसदेखील बंद केली. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी एआयटीए महासचिव हिरण्यमय चॅटर्जी यांनी राजकीय संबंधांचा विपरीत परिणाम लढतीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले,‘सध्या काही बोलणार नाही. एक- दोन दिवस प्रतीक्षा करू. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे परिस्थितीवर लक्ष देत निर्णय घेण्याची विनंती करू. गरज भासल्यास तटस्थस्थळी सामने खेळविण्याची विनंती केली जाईल.’चॅटर्जी पुढे म्हणाले की, ‘पाकने व्हिसा नाकारल्यास आम्ही तेथे जाऊ शकणार नाही. व्हिसा दिला तरी पुरेशी सुरक्षा मिळेलच याची खात्री नाही.’ भारताच्या संघाने याआधी १९६४ साली पाकचा दौरा केला होता. उभय देशांतील संबंध २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ताणले गेले. पाकने अनेक सामने तटस्थ ठिकाणी खेळले आहेत. आम्ही पाकला जाणार नाही, असे म्हणत नाही, पण तेथील परिस्थिती नाजूक आहे. तर अन्यत्र सामने खेळविण्यास आयटीएफने नकार दिल्यास काय, असा सवाल करताच चॅटर्जी म्हणाले, ‘सुरक्षेचे नियम आयटीएफने तयार केले आहेत. काही अघटित झाल्यास जबाबदारी त्यांची असेल. याच कारणांमुळे आम्ही परिस्थितीवर गंभीर विचार करण्याची विनंती केली आहे.’ (वृत्तसंस्था)निर्णयाचा सन्मान करू: पीटीएफपाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष(पीटीएफ)सलीम सैफुल्लाह खान यांनी दोन्ही देशांतील तणावामुळे आयटीएफ डेव्हिस चषकाबाबत जो निर्णय घेईल, त्याचा पूर्ण सन्मान करू, असे म्हटले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना खान म्हणाले,‘ इस्लामाबाद अद्याप सुरक्षित स्थळ आहे. तणाव वाढला तरी तो निवळू शकतो. आमच्यासाठी खेळाडूंचे हित सर्वतोपरी आहे. जय- पराजय महत्त्वाचा नाही, सुरक्षेला महत्त्व आहे.’ ही लढत तटस्थ ठिकाणी होईल, असे म्हणणे सध्यातरी घाईचे ठरेल. आयटीएफला वाटत असेल की सामन्याचे स्थळ बदलले पाहिजे तर मात्र आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करू.