जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच सरावानंतर परतण्याचा तयारीत असताना ८ छोट्या मुला-मुलींनी त्याच्याबरोबर खेळण्याची विनंती केली. त्याने ती तत्काळ मान्य केली आणि हा दिग्गज खेळाडू या सर्व चिमुकल्यांसोबत १५ मिनिटे खेळला. या चिमुरड्यांसाठी ही १५ मिनिटे आयुष्यभर लक्षात राहतील. यावेळी उपस्थित चाहत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत जोकोविचच्या उदार मनाला सलामही केला. हा असतो साधेपणा आणि हीच असते खिलाडू वृत्ती.>यजमानांची उत्सुकता पोहचली शिगेलाजबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या आॅस्टेÑलियाने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य राखताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आपला देश उपांत्य फेरीत पोहचल्याने स्थानिक टेनिसप्रेमींमध्ये सध्या मोठी उत्सुकता पाहण्यास मिळत आहे. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत असल्याने आॅस्टेÑलियाच्या टेनिसपटूंमध्येही मोठा जोश पाहण्यास मिळाला. आता अंतिम सामना गाठण्यासाठी आपल्यापुढे कोणाचे आव्हान उभे राहणार, याचीच उत्सुकता कांगारुंमध्ये पाहण्यास मिळत आहे.
जोकोविचचा मोठेपणा, 'त्या' चिमुरड्यांची इच्छा केली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:09 AM