पॅरिस - क्ले कोर्टचा सम्राट अशी ख्याती असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपनमधीलमधील आपला दबदबा कायम राखला आहे. आज झालेल्या फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेराच्या अंतिम लढतीत नडालने नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर मात करत नदालने विक्रमी १४ व्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला. नदालचे पुरुष एकेरीमधील हे २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
१३ वेळचा फ्रेंच ओपन विजेता राफेल नदाल आणि पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेला कॅस्पर रुड यांच्यातील सामना अगदीच एकतर्फी झाला. पहिल्या सेटमध्ये ६-३ ने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ६-३ ने बाजी मारली. सलग दोन सेट जिंकल्यानंतर नदालने तिसऱ्या सेटमध्ये रुडचा ६-० ने धुव्वा उडवला आणि सामन्यासह विजेतेपदावर कब्जा केला. त्याबरोबरच राफेल नदालने २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणार पहिला पुरुष खेळला आहे.
टेनिसमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम मार्गारेट कोर्टच्या नावावर आहे. तिने २४ विजेतेपदे पटकावली आहे. तर सेरेना विल्यम्सने २३ आणि स्टेफी ग्राफने २२ विजेतेपदे पकावली आहे. तर राफेल नदालने ३० मेजर फायनलमध्ये २२ वा विजय मिळवला आहे. तर फेडरर आणि जोकोविक यांनी ३१ वेळा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये खेळताना प्रत्येकी २० विजेतेपदे पटकावली आहेत.
राफेल नदालने कारकिर्दीत १४ वेळा फ्रेंच ओपन, ४ वेळा अमेरिकन ओपन, दोन वेळा विम्बल्डन आणि दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावले होते. २०२२ हे साल नदालला यशदायी ठरलं आहे. त्याने जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.