सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगरसेवकांनी इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणे शहाराध्यक्ष पंचम कलानी यांनी बंधनकारक केले. यावरून युवानेते ओमी कलानी व पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्यात कलगीतुरा रंगला असून पक्ष्याच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोघांतील वादावर पडदा टाकण्याची मागणी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.
उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षात कलानी कुटुंबाची घरवापसी झाल्यानंतर, पक्षाचे शहराध्यक्ष पद पंचम कलानी यांच्याकडे देण्यात आले. तर दुसरीकडे भारत गंगोत्री यांची वर्णी प्रदेश कार्यकारणीवर लावून पक्षातील गंगोत्री गटाला सबुरीने घेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी व कमलेश निकम यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरवात केली. यामध्ये पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांनाही इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यास बंधनकारक करण्यात आले. नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरायचे असेलतर गंगोत्री यांनीजी इच्छुक उमेदवारीचा अर्ज शहराध्यक्ष पंचम कलानी यांच्याकडे भरावा. असे वक्तव्य ओमी कलानी यांनी केले.
ओमी कलानी यांच्या या वक्तव्यावरून गंगोत्री विरुद्ध ओमी कलानी असा सामना रंगल्याचे चित्र शहरात आहेत. इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणे बंधनकारक असल्याचा सल्ला आम्हाला देऊ नये. असा पवित्रा गंगोत्री यांनी घेऊन ओमी कलानी आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित केला. आम्ही इच्छुक उमेदवारीचा अर्ज शहराध्यक्षा ऐवजी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे भरू शकतो. असे प्रतिआव्हान गंगोत्री यांनी कलानी कुटुंबाला केले. महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर एकाच म्यानात दोन तलवारी कश्या काय राहू शकतो. असा प्रश्न कार्यकर्ते व दोन्ही गटाचे समर्थक विचारीत आहेत.पप्पु कलानी सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीत चैतन्य माजी आमदार पप्पु कलानी हे जेल बाहेर आल्याने, त्यांच्या झंझावत दौऱ्याने शहरात चैतन्य निर्माण झाल्याची चित्र आहे. यांच्यासह ओमी कलानी, पंचम कलानी, सीमा कलानी, पक्ष प्रवक्ता कमलेश निकम, मनोज लासी, शिवाजी रगडे आदी तरुणांच्या फोजने कलानी महलात विविध कार्यक्रमाची बहेर आली आहे महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगरसेवकासह इतरांनी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरणे बंधनकारक असल्याचा फतवा शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी काढला