इंडियन वेल्स (यूएस) : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याने इंडियन वेल्स एटीपी स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. फेडररने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना जेरेमी जार्डी याचा ७-५, ६-४ असा धुव्वा उडवला.जानेवारी महिन्यात आॅस्टेÑलियन ओपनच्या २०वे ग्रँडस्लॅम जिंकल्यापासून ३६ वर्षीय फेडरर अपराजित राहिला असून त्याने यंदा खेळलेल्या सर्व १५ लढती जिंकल्या आहेत. अन्य लढतीत क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच याने चुरशीच्या सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्ज याचा ६-२, ६-७(६-८), ६-४ असा पाडाव केला. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन यानेही विजयी कूच करताना स्पेनच्या पाब्लो कारेनो बस्टा याला ४-६, ६-३, ७-६(८-६) असे नमविले. (वृत्तसंस्था)महिलांमध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल सिमोना हालेपने अपेक्षित विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. हालेपने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिचविरुद्ध झुंजार विजय मिळवताना ६-४, ६-७(५-७), ६-३ अशी बाजी मारली.यासह हालेपने जागतिक क्रमवारीतील आपले अव्वल स्थान निश्चित केले आहे. अन्य लढतीत जपानच्या नाओमी ओसाकाने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना पिलिस्कोवा हिला ६-२, ६-३ असा धक्का दिला.
फेडररची घोडदौड कायम, उपांत्यपूर्व फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:25 AM