शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

फेडरर, नदाल यांची अपेक्षित आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:41 AM

ऑस्ट्रेलियन ओपन; शारापोवा, कर्बर यांनी मिळवला एकतर्फी विजय

मेलबर्न : गतविजेता रॉजर फेडरर, राफेल नदाल या दिग्गजांनी आपापल्या सामन्यांत बाजी मारताना    ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विजयी आगेकूच केली. महिलांमध्ये द्वितीय मानांकित अँजोलिका कर्बर, मारिया शारापोवा आणि कॅरोलिन वोज्नियाकी यांनीही आपापल्या लढती जिंकून आगेकूच केली.

विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने सलग तीन सेटमध्ये बाजी मारली असली, तरी त्याला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. ब्रिटनच्या डॅनियल इवान्सने याने अनुभवी फेडररला २ तास ३५ मिनिटांपर्यंत झुंजविले. पहिले दोन सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर फेडररने इवान्सला आपला हिसका दाखविला आणि सामना ७-६(७-५), ७-६(७-३), ६-३ असा जिंकला. जर मी सुरुवातीपासून दबाव निर्माण केला असता, तर नक्कीच ही लढत लवकर संपली असती,’ अशी प्रतिक्रिया फेडररने या वेळी दिली.दुसरीकडे, राफेल नदालने १८व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे वाटचाल करताना  ऑस्ट्रेलियच्या मॅथ्यू एबडेन याचा ६-३, ६-२, ६-२ असा सहज पराभव केला. ‘ही लढत आव्हानात्मक झाली. एकतर्फी झालेल्या या लढतीत नदालने १ तास ५६ मिनिटांमध्ये बाजी मारली. विशेष म्हणजे या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यास नदाल ओपन युगामध्ये राय एमरसन आणि रॉड लावेर यांच्यानंतर प्रत्येक ग्रँडस्लॅम किमान दोनवेळा जिंकणारा तिसरा टेनिसपटू ठरेल.

पाचव्या मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन यानेही विजयी आगेकूच करताना अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो याचा ४-६, ६-४, ६-४, ७-५ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर अँडरसनने जबरदस्त पुनरागमन केले. तसेच सहाव्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिच याने अमेरिकेच्या मॅकेंजी डोनाल्ड याचे कडवे आव्हान पाच सेटमध्ये संपुष्टात आणले. ३ तास ३७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात अनुभवी सिलिच याने ७-५, ६-७, ६-४, ६-४ असा झुंजार विजय मिळवताना विजयी आगेकूच केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररRafael Nadalराफेल नदाल