नवी दिल्ली : अंकिता रैनाच्या बळावर फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत भारताने फार चांगली कामगिरी केली ही कामगिरी उत्साहवर्धक होती असे नमूद करीत टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने भारतीय संघ मात्र पुढील फेरी गाठण्याचा हकदार होता, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.मागच्या आठवड्यात झालेल्या रेलिगेशन प्ले आॅफ लढतीत भारतीय संघाने चायनीज तायपेईवर २-० ने विजय नोंदवित आशिया- ओसियाना ग्रुपमध्ये स्थान कायम राखले. त्याआधी,भारताचा चीन आणि कझाखस्तानकडून मात्र पराभव झाला. यावर सानिया म्हणाली,‘ युवा खेळाडूंच्या कौशल्यात भर पडल्यानंतरही आम्ही नेहमी रिकाम्या हाताने परतत आहोत. अंकिताने मात्र रँकिंगमध्ये पहिल्या शंभर जणात असलेल्या खेळाडूंवर दोनदा विजय नोंदविला हे फारच प्रभावित करणारे दृष्य होते. संघाने सामने गमावले तरी त्यातून सकारात्मक चित्र उभे झाले आहे.’ (वृत्तसंस्था)सानियापेक्षा दमदार खेळाडू घडावा...भविष्यातील सानिया बनण्याची क्षमता कुठल्या खेळाडूमध्ये आहे, असा सवाल करताच सानिया म्हणाली,‘युवा खेळाडूंचा विचार करायचा झाल्यास त्यांच्या कामगिरीला आधार मानू नये.’जखमांमुळे कोर्टपासून दूर असलेल्या सानियाची दुहेरी रँकिंगमध्ये १४ स्थानांनी घसरण झाली.याविषयी ती म्हणाली,‘भविष्यातील सानिया कोण, हा प्रश्न अनेक वर्षांपासून मला विचारला जात आहे. मी नेहमी सांगत आले की पुढची सानिया का? सानियापेक्षा आणखी सरस खेळाडू शोधण्याचा प्रयत्न का होऊ नये? सानियापेक्षा दमदार खेळाडू बनण्यासाठी युवा खेळाडूंनी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवायला हवी.’सानिया मिर्झाने यावेळी युवा खेळाडू अंकिता रैनाच्या कामगिरीचे कौतुक केले. सानिया म्हणाली, ‘अंकिताचे प्रदर्शन शानदार राहिले. तिने दोन वेळा जागतिक क्रमवारीत अव्वल १०० मध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला.’ त्याचप्रमाणे, ‘या कामगिरीनंतरही भारतीय संघ पराभूत झाला असला तरी, यातून सकारात्मक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. युवा खेळाडूंनी आता अधिक मेहनत घ्यावी.’सेरेना सर्वात महान खेळाडूसेरेना विलियम्सचा अपवाद वगळता महिला टेनिसवर कुठल्याही एका खेळाडूचे वर्चस्व राहिलेले नाही. तिच्या व्यतिरिक्तकुणीही जेतेपदाचा बरोबरीचादावेदार असतो. सेरेना जेव्हा-जेव्हा पराभूत होते तेव्हा जेतेपदाचेअनेक दावेदार असतात. सेरेना टेनिसमधील सर्वात महान खेळाडूआहे. महिला टेनिसमध्ये फारचचढाओढ आहे. त्यामुळेच अधिकरँकिंग असलेली खेळाडूही चौथ्याकिंवा पाचव्या स्थानावरील खेळाडूला पराभूत करताना दिसते.’- सानिया मिर्झा
फेडरेशन चषकातील कामगिरी उत्साहवर्धक - सानिया मिर्झा; युवा खेळाडूंच्या कामगिरीने प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:25 PM