पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोना हालेपने एकतर्फी सामन्यात सहज विजय मिळवताना फ्रेंच ओपन टेनिसस्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या क्रमांकावरील कॅरोलिन व्होज्नियाकीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. पुरुषांमध्ये संभाव्य विजेत्या राफेल नदालने अपेक्षित आगेकूच कायम ठेवताना जर्मनीच्या मॅक्समिलियन मार्टेरर याचा सरळ तीन सेटमध्येधुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.फ्रेंच ओपन २०१४ व २०१७ मध्ये उपविजेती ठरलेल्या हालेपने १६ व्या मानांकित बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा ६-२, ६-१ ने पराभव करीत तिसºयांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. हालेपला ही लढत जिंकण्यासाठी केवळ ५९ मिनिटे लागले. त्यात दुसरा सेट केवळ २२ मिनिटांमध्ये जिंकला.रोमानियाच्या हालेपने जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठणाºया एलिसची सर्व्हिस सहावेळा भेदली. अव्वल मानांकित हालेपला उपांत्य फेरी गाठण्यासाठी १२ व्या मानांकित जर्मनीच्या एंजेलिक कर्बर व सातवे मानांकन प्राप्त कॅरोलिन गार्सिया यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. व्होज्नियाकीला जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या दारिया कसात्किनाविरुद्ध ६-७, ३-६ ने पराभव स्वीकारावा लागला.पुरुषांच्या गटामध्ये ‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदालने आपला दबदबा कायम राखताना एकतर्फी झालेल्या सामन्यात मार्टेरर याचा ६-३, ६-२, ७-६(७-४) असा धुव्वा उडवला. तिसºया सेटमध्ये मार्टेरर याच्याकडून थोडासा प्रतिकार मिळाला, परंतु नदालच्या अनुभवापुढे त्याचा निभाव लागला नाही. पहिले दोन सेट सहजपणे जिंकून सामन्याचे चित्र स्पष्ट केलेल्या नदालला तिसºया सेटमध्ये काहीसे झुंजावे लागले. पण अखेर त्याने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत बाजी मारली. (वृत्तसंस्था)दारियाचा धडाकादारियाने कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. रविवारी दुसरा सेट ३-३ ने बरोबरीत असताना अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला होता. आज दारियाने सलग तीन गेम जिंकत अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले. दारियाला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिका ओपन चॅम्पियन स्लोएन स्टिफन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
फ्रेंच ओपन टेनिस : हालेप, नदाल उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 11:51 PM