पुणे : भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करून स्पेनच्या एड्रियन मेनेनडेजचा पराभव करून महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे बेलारूसचा इल्या इव्हाश्का, स्पेनचा रिकार्डो ओझेदा लारा, ब्राझीलचा टी. माँटेरिओ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.महाराष्टÑ लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसºया चरणात सुमित नागलने स्पेनच्या एड्रियन मेनेनडेज मॅसिरासचा ६-२, ३-६, ६-४ गुणांनी तीन सेटमध्ये संघषपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत २२३ व्या स्थानावर असलेल्या नागलने अफलातून खेळाचे प्रदर्शन केले.स्पेनच्या रिकार्डो ओझेदा लारा ब्राझीलच्या जे. सुएजानेचा ६-३, ६-४ असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. बेलारूसच्या इल्या इव्हाश्काने स्पेनच्या कार्लोस टेबर्नरचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ब्राझीलच्या टी. माँटेरिओ याने भारताच्या प्रजनेश गुणनेश्वरणचे कडवे आव्हान ७-५ ७-५ असे सरळ दोन सेटमध्ये मोडीत काढून दिमाखात आगेकूच केली.आजच्या या विजयामुळे २० वर्षीय सुमित नागालला आणखी एक युवा पात्रता वीर इल्या इव्हाश्का याच्याशी टाटा पहिल्या फेरीत झुंज देण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा सोमवारी (१ जानेवारी) सुरू होणार आहे. मुख्य फेरीत प्रवेश निश्चित केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या सुमितने बेलारूसच्या इव्हाश्कावर विजय मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला. ‘टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत असून इव्हाश्काविरुद्ध पहिल्या फेरीच्या लढतीसाठी मी अतिशय उत्सुक आहे. पहिल्या फेरीची ही लढत निश्चितच चुरशीची होईल, परंतु ती जिंकून स्पर्धेच्या उत्तरार्धापर्यंत टिकून राहण्याचा मला विश्वास वाटतो,’ असे नागलने यावेळी म्हटले.
भारताचा सुमित नागल मुख्य फेरीत, एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 3:22 AM