शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

माद्रिद ओपन : क्ले :फेडररचे विजयी पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:32 AM

तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

माद्रिद : तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. केवळ ५२ मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने गास्केटचा ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला.याआधी या स्पर्धेत फेडररने २००६, २००९ आणि २०१२ साली जेतेपद उंचावले होते. याआधी १२ मे २०१६ रोजी रोम येथे डॉमनिक थिएमविरुद्ध पराभूत झाल्यानंतर फेडरर तीन वर्षे क्ले कोर्टपासून दूर राहिला होता. ग्रास कोर्टवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने काही काळ क्ले कोर्टवर न खेळण्याचा निर्णय घेतला होता. या विजयासह फेडररने गास्केटविरुद्ध झालेल्या २१ लढतींपैकी १८ सामने जिंकले.त्याचवेळी अन्य लढतीत अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचनेही सहज आगेकूच करताना केवळ ६५ मिनिटांमध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा ६-४, ६-२ असा पराभव केला. या स्पर्धेत जोकोविचने २०११ आणि २०१६ साली जेतेपद पटकावले होते. पुढील महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ओपनस्पर्धेत बाजी मारून सलगचौथी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याच्या निर्धाराने जोकोविच खेळत आहे. (वृत्तसंस्था)महिलांमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात स्पेनच्या सारा सोरीबस टोर्मोचा ७-६, ३-६, ६-० असा पाडाव केला. दुसरा सेट जिंकून साराने सामना बरोबरीत आणत सर्वांना धक्का दिला. मात्र, यानंतर कसलेल्या ओसाकाने साराला एकही गेम जिंकण्याची संधी न देता सहज बाजी मारली. तिसºया मानांकित सिमोना हालेपनेही अपेक्षित आगेकूच करताना योहाना कोंटाचे आव्हान ७-५, ६-१ असे संपुष्टात आणले. 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस