लाहोर : पाकिस्तानची महिला टेनिस स्टार मेहक खोखर सध्या चर्चेत आहे. मेहकने भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिला पाकिस्तानात येऊन पाकिस्तानी महिला टेनिस संघाचे प्रशिक्षक बनण्याचे आवाहन केले आहे. सानियाने प्रशिक्षण दिले तर पाकिस्तानचा महिला टेनिस संघ अधिक चांगली कामगिरी करू शकेल, असे तिचे म्हणणे आहे.मेहक खोखरने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, लवकरच पाकिस्तान फेडरेशन कपसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होणार आहेत. सानिया मिर्झा सतत पाकिस्तानात येत असते. त्यामुळे अशा परिस्थितीत सानियाने पाकिस्तानच्या महिला टेनिस संघाला मार्गदर्शन व प्रशिक्षण द्यावे.
सानिया भाभीला पाकिस्तानची प्रशिक्षक करा : मेहक खोखर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:29 IST