मेलबोर्न : जगातील नंबर वन टेनिसपटू रुमानियाची सिमोना हालेप हिला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी खºया अर्थाने ‘नंबर वन’ सारखा खेळ करून दाखवावा लागला. अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसने तिला विजयासाठी तब्बल पावणेचार तास झुंजायला भाग पाडले. यादरम्यान सिमोना एक-दोन वेळा नाही तर तीन वेळा अक्षरश: हरता हरता वाचली. तब्बल तीन मॅच पॉर्इंट वाचवत सिमोनाने हा मॅरेथॉन सामना ४-६, ६-४, १५-१३ असा जिंकला आणि चौथी फेरी गाठली. १९९६ नंतरचा आॅस्ट्रेलियन ओपनमधला हा सर्वाधिक गेम खेळला गेलेला सामना ठरला. १९९६ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या चंदा रुबीनने स्पेनच्या अरांता सांचेझ व्हिकारिओवर ६-४, २-६, १६-१४ असा विजय मिळवला होता. नेमके तेवढेच ४८ गेम शनिवारच्या सामन्यातही खेळले गेले. या सामन्यातील शेवटचा एकच सेट तब्बल दोन तास २२ मिनिटे चालला. या अक्षरश: दमछाक करणाºया विजयानंतर सिमोना म्हणाली की, एवढा प्रदीर्घ तिसरा सेट मी कधीच खेळले नव्हते. मी प्रचंड थकले होते. माझे पायाचे घोटे आणि स्नायू अक्षरश: बधिर झाले होते. तिसºया सेटमध्ये तीन वेळा हालेपला मॅच पॉर्इंट होता, परंतु प्रत्येक वेळी डेव्हिसने तिला विजयापासून वंचित ठेवले. तिसºया सेटमध्ये ५-४, ६-५ आणि ८-७ असा स्कोअर असताना हालेपला हे मॅच पॉर्इंट मिळाले होते. या थकविणाºया विजयानंतर हालेपचा चौथ्या फेरीचा सामना आता जपानच्या नाओमी ओसाकाशी होईल.फेडरर, जोकोविच पुढच्या फेरीतगतविजेता रॉजर फेडरर याने आपल्या २० व्या ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. फेडरर याने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केत याला ६-२, ७-५, ६-४ असे पराभूत केले. आता त्याचा सामना हंगेरीच्या मार्टिन फुस्कोविक्स, तर उपांत्य फेरीत त्याचा सामना थॉमस बर्डिच सोबत होऊ शकतो. सहा वेळचा विजेता नोवाक जोकोविचने स्पेनच्या २१ व्या मानांकित अल्बर्ट पानोस विनोलास याला ६-२, ६-३, ६-३ असे पराभूत केले. त्याला सामन्यादरम्यान कंबरेच्या दुखण्यामुळे वैद्यकीय मदत घ्यावी लागली. महिला गटात अंजेलिक कर्बर हिने मारिया शारापोवा हिला ६-१, ६-३ असे पराभूत केले.कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि कॅरोलिना गार्सिया यादेखील पुढच्या फेरीत पोहचल्या आहेत. प्लिस्कोव्हा हिने चेक गणराज्यच्या लुसी सफारोवा हिला ७-६, ७-५ असे पराभूत केले. तर अमेरिकन ओपनची उपविजेती खेळाडू मेडिसन किस हिने रोमानियाच्या अना बोगडान हिला ६-३, ६-४ असे पराभूत केले.
मॅरेथॉन सामन्यात नंबर वनचा लागला कस; सिमोना हालेपचा विजयासाठी पावणेचार तास संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 1:24 AM