शेनझेन : पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन रशियाच्या मारिया शारापोव्हाने एक सेटने पिछाडीनंतरही शानदार पुनरागमन केले आणि अमेरिकेच्या एलिसन रिस्के हिचा पराभव केला. या विजयाबरोबरच मारियाने शेनझेन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.जगातील माजी नंबर वन खेळाडू असलेल्या मारियाला एलिसनने संघर्ष करायला भाग पाडले. मात्र, अनुभवाच्या जोरावर मारियाने दीड तास चाललेल्या सामन्यात ३-६, ६-४, ६-२ ने बाजी मारली. एलिसनने सुरुवातीला आघाडी मिळवल्यानंतरही शारापोव्हाने ३४ विनर लगावले जे अमेरिकन खेळाडूच्या तिप्पट होते. जगात ५९व्या क्रमांकावर असलेल्या शारापोव्हाने जिंकण्याचा प्रयत्न सोडला नाही. फ्रेंच ओपन चॅम्पियन व दुसरी मानांकित येलेना ओस्तापेंकोला चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना प्लिसकोव्हाविरुद्ध १-६, ४-६ ने पराभवाचा सामना करावा लागला.
मारिया शारापोव्हाचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 1:57 AM