लंडन: जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू स्पेनचा राफेल नदाल याला एटीपी फायनल्स टेनिसच्या पहिल्याच सामन्यात विद्यमान विजेता अलेक्झांडर झ्वेरेवकडून सनसनाटी पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे, स्टीफेनोस सिटसिपास याने मात्र शानदार विजयी सुरुवात केली.कारकिर्दीमध्ये आतापर्यंत ही स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरलेल्या नदालचे दुखापतीतून सावरल्यानंतर येथे पुनरागमन झाले, पण झ्वेरेवन आक्रमक खेळ करत त्याला ६-२, ६-४ असे नमवले . जर्मनीच्या झ्वेरेवविरुद्ध नदालचा विजयाचा रेकॉर्ड या सामन्याआधी ५-० असा होता. या लढतीत नदाल सुरुवातीपासून फॉर्ममध्ये जाणवलाच नाही. त्याचवेळी, सहावा मानांकित सिटसिपास याने डेनिल मेदवेदेव याच्यावर ७-६ (७-५), ६-४ ने विजय नोंदविला. नदाल या पराभवानंतर नोवाक जोकोविचकडून अव्वल स्थान गमावू शकतो.जोकोविचने रविवारी मॅटियो बॅरेटिनीविरुद्ध विजय मिळवत शानदार सुरुवात केली. रॉजर फेडरर मात्र डोमिनिक थिएमकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाला.>याआधी टेनिससम्राट दिग्गज रॉजर फेडररलाही पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता. डॉमनिक थिएम याने फेडररला अनपेक्षितपणे नमवून टेनिसविश्वाचे लक्ष वेधले होते. केवळ दोन सेटमध्ये अलेक्झांडर झ्वेरेवने बाजी मारताना अनुभवी राफेल नदालला पुनरागमनाची फारशी संधीच दिली नाही. झ्वेरेवने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत नदालला दबावाखाली ठेवले. यामुळे नदालकडून अनेक चुकाही झाल्या.
नदालचा सनसनाटी पराभव, जागतिक अव्वल स्थान धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:47 AM