न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस : जिच्यामुळे टेनिसची आवड लागली. जिच्या यशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून टेनिसमध्ये उंच भरारी घेण्याची प्रेरणा मिळाली. टेनिसमधली आपली आदर्श कोण, असे विचारताच पहिले नाव जिचे असायचे त्या सेरेना विल्यम्सलाच नमवून जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. वादग्रस्त ठरलेल्या या सामन्यात ओसाकाने ६-२, ६-४ अशा सरळ सेटमध्ये अमेरिकेच्या सेरेनाला पराभूत केले. ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीत जेतेपद जिंकणारी ओसाका ही जपानची पहिलीच खेळाडू ठरली.
१ तास १९ मिनिटांच्या या लढतीत ओसाकाने वर्चस्व गाजवले. कोर्टवरील पंचाशी हुज्जत घातल्याने सेरेनाला पेनल्टी बसली. सामन्यानंतर सेरेनाने आपल्याकडून सामना चोरून घेतल्याचा आरोप केला. वारंवार ताकीद देऊनही सेरेना नियमांचे पालन करत नव्हती.
https://t.co/VtxXIMiYRS https://t.co/MAdXSVVobZ