सिनसिनाटी : आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गीयोस याने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू राफेल नदाल याचा ६-२, ७-५ असा पराभव करताना सिनसिनाटी मास्टर्स एटीपी डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.या दिवसाच्या खेळाचे आकर्षणही जागतिक क्रमवारीतील २३ वा मानांकित किर्गीयोसठरला. आता तो उपांत्य फेरीत स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळेल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना बल्गेरियाच्या ११ व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव व अमेरिकेच्या जॉन इस्नेर यांच्यात होईल.तत्पूर्वी, किर्गीयोसने क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा ४-६, ७-६, ६-३ असा पराभव केला होता, तर नदालने अल्बर्ट रामोस विनोलेस याच्यावर ७-६, ६-२ असा विजय मिळवला होता.महिला गटात कॅरोलिना प्लिसकोव्हाने इटलीच्या क्वॉलिफायर कामिला जियोर्जी हिचा ६-३,४-६, ६-० असा पराभव केला. पावसामुळे काल पाच सामनेस्थगित करण्यात आले ते आज खेळवण्यात आले.द्वितीय मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेप हिने ब्रिटनच्यासातव्या मानांकित जोहानकोंटा हिच्यावर ६-४, ७-६ अशीमात केली. (वृत्तसंस्था)
राफेल नदालला नमवून निक किर्गीयोस उपांत्य फेरीत, स्पेनच्या डेव्हिड फेररविरुद्ध खेळणार उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 4:56 AM