Novak Djokovic vs Nick Kyrgios, WIMBLEDON Final 2022 : राफेल नदालने दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली अन् ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसची लॉटरी लागली. नदालच्या माघारीमुळे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हाच यंदाच्या विम्बल्डन जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि निकालही तसाच लागला. नोव्हाकने सातव्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावले. त्याने यापूर्वी २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९ व २०२१ मध्ये येथे जेतेपदाचा चषक उंचावला होता. हे त्याचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले आणि त्याने रॉजर फेडररला ( २०) मागे टाकले. राफेल नदाल सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅमसह आघाडीवर आहे.
चौथ्या सेटमध्ये कमालीचा थरार पाहायला मिळाला. निकने १-२ अशा पिछाडीवरून त्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी मिळवली. निकने ६-५ अशा आघाडीसह स्वतःची बाजू थोडी वरचढ केली. नोव्हाकने ६-६ अशी बरोबरी मिळवताना टाय ब्रेकमध्ये हा सेट नेला. निकने या टाय ब्रेकरमध्ये दोन मॅच पॉईंट वाचवले. नोव्हाकने पण मॅच पॉईंट घेतला अन् ४-६, ६-३, ६-४, ७-६ अशा फरकाने जेतेपद नावावर केले.