नवी दिल्ली : मी आयुष्यात बरेच काही मिळवले आहे. आता पुढील लक्ष्य आखणे माझ्यासाठी तरी कठीण आहे. तरीही मी प्रयत्नशील आहे, असे १८ ग्रॅण्डस्लॅम आणि देशाला आॅलिम्पिक पदक मिळवून देणा-या ४४ वर्षीय लिएंडर पेसने सांगितले.भारताचा महान टेनिसपटू म्हणून पेसचे नाव घेतले जाते. सर्वात अनुभवी आणि तितकाच आधुनिक असलेला पेस आजही तितकीच मेहनत घेतोय. त्याची खेळण्याची भूक कमी झालेली नाही. त्याचे बरेचसे सहकारी सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतात. बºयाच ज्युनियर खेळाडूंनी निवृत्तीसुद्धा घेतली आहे; पण पेस हा आजही युवकांना लाजवेल असा खेळ करतो. तो तितक्याच उत्साहाने कोर्टवर उतरतो.या महान टेनिसपटूने आपल्या मुलाखतीत त्याचे विचार प्रकट केले. तो म्हणतो, की दुहेरीत मात्र नव्या शैलीने पुनरागमन करता येते. माझ्यासाठी शारीरिक क्षमता वाढवणे आणि नवे लक्ष्य ठरवणे कठीण आहे. तरीही मी प्रयत्नशील आहे. मी स्वत:ला नेहमी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. पेसच्या निवृत्तीवर बºयाचदा प्रश्न उठवण्यात आले. त्याबाबत तो म्हणाला, सध्या तरी मी माझ्या कारकिर्दीच्या चांगल्या वेळेतून जात आहे. ज्यात मी काहीतरी सिद्ध करू शकतो. आतासुद्धा चेंडू आणि कोर्टवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होणे, ही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी खेळाचा आनंद घेत आहे. मी सर्व काही मिळवले. आता मला माझ्यासाठी खेळायचे आहे. मी लोकांना हे सांगून प्रेरित करू इच्छितो, की लिएंडर हा संघर्षातून पुढे जात खेळू शकतो तर तुम्ही का नाही? तुम्हीसुद्धा असे करू शकता. सध्या आपण अशा स्थितीत जगत आहोत, जिथे जीवन खूप कठीण झालेय. प्रत्येक ठिकाणी दहशतवाद, गरिबी आणि जीवनाचा वाढता खर्च हे निराशेकडे घेऊन जातात. एवढे घोटाळे होतायेत. अशात आपणास चांगल्या ‘रोल मॉडेल’ची गरज आहे. जो आपले जीवन कठीण असले तरी ते चांगले कसे होऊ शकते, हे सांगेल.सर्व्हिस,फोरहॅण्ड हे ताकदीमुळे अधिक मजबूतमाझ्या मते, खेळातील कौशल्य, वजन, ताजेपणा आणि खेळण्याचा अंदाज हे तुमच्यातील खरी ताकद सिद्ध करते. सर्व खेळाडू सहा फुटांहून अधिक उंचीचे व शक्तिशाली आहेत. अशा वेळी तितक्याच ताकदीच्या प्रहारासाठी तुमच्याकडे कमी वेळ असते.ही एक कौशल्याची परीक्षा असते; कारण चेंडू खूप वेगाने तुमच्याकडे येत असतो. सर्व्हिस आणि फोरहॅण्ड हे ताकदीमुळे अधिक मजबूत होतात.
आता पुढील लक्ष्य आखणे माझ्यासाठी कठीण : लिएंडर पेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:03 AM