लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे.पेस आणि राजा या अग्रमानांकित जोडीने ७५ हजार डॉलर पारितोषिकाच्या हार्डकोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रुआन रोएलोफ्स आणि जो सेलिसबरी या जोडीला ७-६,६-३ असे पराभूत केले. ऑगस्टमध्ये एकत्र जोडी बनवल्यापासून पेस आणि राजा पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. पेसने यंदाच्या सत्रात तीन चँलेंजर विजेतेपद पटकावले आहे. त्याने कॅनडाच्या आदित शमासदीनसोबत लियोन आणि इलक्लेत विजेतेपद पटकावले. तर अमेरिकेच्या स्कॉट लिप्सकीसोबत तालाहाशीत विजेतेपद मिळवले. पुरव राजा याने द्विज शरण सोबत बोड्यरु चँलेंजरचे विजेतेपद पटकावले होते. आणि एटीपी २५0 चेन्नई ओपनच्या अंतिम फेरीत जागा मिळवली होती.
पेस, राजा नाक्सविले चॅलेंजरच्या अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:31 PM
लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. पेस आणि राजा या अग्रमानांकित जोडीने ७५ हजार डॉलर पारितोषिकाच्या हार्डकोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रुआन रोएलोफ्स आणि जो सेलिसबरी या जोडीला ७-६,६-३ असे पराभूत केले.
ठळक मुद्देएकत्र जोडी बनवल्यापासून पेस आणि राजा पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत