शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
7
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
8
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
9
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
10
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
11
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
12
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
13
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
14
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
15
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
16
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
17
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
18
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
19
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
20
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : अंंकिता रैना, करमन कौर यांना दुहेरी मुकुटाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 10:20 PM

विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी भारताची अंकिता रैना हिने अपेक्षेनुसार खेळ करीत २५ हजार डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंकिता रैना आणि करमन कौर थांडी या भारतीय खेळाडूंना दुहेरी मुकुट जिंकण्याची संधी आहे.

पुणे  - विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी भारताची अंकिता रैना हिने अपेक्षेनुसार खेळ करीत २५ हजार डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंकिता रैना आणि करमन कौर थांडी या भारतीय खेळाडूंना दुहेरी मुकुट जिंकण्याची संधी आहे. गुरूवारी अंकिता, करमन यांच्यासह स्लोव्हेनियाची तामरा झिदनसेक, स्पेनची इवा गुरेरो अल्वारेज यांनीही एकेरी प्रकारातून उपांत्य फेरी गाठली. शिवाय दुहेरी अंकिता-करमन जोडीने दुहेरी प्रकारातून अंतिम फेरीत धडक दिली आहे.

नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील एमएसएलटीए स्कूल आॅफ टेनिस येथे सुरू आहे. एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित अंकिताने विजयी घोडदौड कायम राखताना चीनच्या कै लीन झाँगचा हिचे आव्हान ६-०, ६-० असे सहजपणे संपुष्टात आणले. हा सामना ५३ मिनिटे चालला. चौथ्या मानांकित करमनने १ तास ५४ मिनिटे रंगलेल्या लढतीत युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवाचा टायब्रेकमध्ये ७-६(९), ६-२ असा पराभव केला.स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकित तामरा झिदनसेकने रशियाच्या मरिना मेलनिकोवा हिच्यावर ३-६, ६-०, ६-३ अशा फरकाने सरशी साधत अंतिम ४ खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना १ तास ४५ मिनिटे चालला. पहिला सेट जिंकून आघाडी घेणाºया मरिनाने नंतर मात्र सामन्यावरील पकड गमावली. स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज हिने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाºया रोमानियाच्या जॅकलीन एडिना क्रिस्टियनची कौतुकास्पद वाटचाल ६-२, ६-२ने रोखली.

अंकिता-करमन आणि अलेक्झांड्रा नेदिनोवा (बल्गेरिया)-तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) यांच्यात दुहेरी गटाची अंतिम लढत रंगणार आहे. उपांत्य फेरीत अंकिता-करमन या भारतीय जोडीने रशियाची अमिना अंशबा व पोलंडची कनिया पॉला यांच्या जोडीवर ६-३, ६-३ने मात करून अंतिम फेरी गाठली. दुसºया उपांत्य फेरीत अलेक्झांड्रा-तामरा जोडीने कॅ नडाची शेरॉन फिचमन आणि पोलंडची कातरझायना पीटर यांच्या जोडीवर ६-१, ६-४ने विजय मिळविला.

निकाल :एकेरी : उपांत्यपूर्व फेरी : करमन कौर थांडी (भारत) वि. वि. व्हॅलेरिया स्राखोवा (युक्रेन) ७-६ (९), ६-२. अंकिता रैना (भारत) वि. वि. कै लीन झाँग (चीन) ६-०, ६-०. तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. मरिना मेलनिकोवा (रशिया) ३-६, ६-०, ६-३. इवा गुरेरो अल्वारेज (स्पेन) वि. वि. जॅकलीन एडिना क्रिस्टियन (रोमानिया) ६-२, ६-२.

दुहेरी गट : उपांत्य फेरी : अंकिता रैना(भारत)-करमन कौर थांडी (भारत) वि. वि. अमिना अंशबा (रशिया)-कनिया पॉला (पोलंड) ६-३, ६-३. अलेक्झांड्रा नेदिनोवा (बल्गेरिया)-तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. शेरॉन फिचमन (कॅनडा)-कातरझायना पीटर (पोलंड) ६-१, ६-४.

टॅग्स :TennisटेनिसPuneपुणे