शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

राफेल नदालनं पटकावलं 11वे फ्रेंच ओपनचे जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 9:42 PM

फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरी सामन्याच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डॉमनिकला पराभवाची धूळ चारली आहे.

पॅरिस- फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमला पराभवाची धूळ चारली आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालनं ऑस्ट्रियाच्या थिएमचा 6-4, 6-3, 6-2 असा धुव्वा उडवला. दोन तास चाललेल्या सामन्यात राफेलनं थिएमला संधीच दिली नाही. राफेलनं या सामन्यातील विजयासह 11 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावण्याचा मान मिळवला आहे. 

सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन पटकावलेल्या नदालने अकराव्यांदा येथे बाजी मारली असून कारकिर्दीतील एकूण १७ ग्रँडस्लॅम जेतेपदांची नोंद केली. त्याच्याहून जास्त ग्रँडस्लॅम केवळ स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने (२०) पटकावली आहेत. त्याचबरोबर नदालने एकाच ग्रँडस्लॅममध्ये सर्वाधिक जेतेपद पटकावण्याच्या मार्गारेट कोर्टच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली. मार्गारेटने १९६० ते १९७३ या कालावधीमध्ये आॅस्टेÑलियन ओपनमध्ये अशी कामगिरी केली होती. दरम्यान, नदाल आणि थिएम दहाव्यांदा क्ले कोर्टवर आमनेसामने आले होते आणि यात नदालने सातव्यांदा बाजी मारली आहे.स्पर्धेतील थिएमची वाटचाल पाहता, अंतिम सामना चुरशीचा होण्याची शक्यता होती. मात्र अनुभवी नदालने तुफानी खेळ करताना सामना एकतर्फी केला. दुसºयाच गेममध्ये थिएमची सर्विस भेदत नदालने जेतेपद आपणच पटकावणार असल्याचे स्पष्ट केले आणि झालेही तसेच. यानंतर थिएमने काही चांगले फटके मारत पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, जबरदस्त नियंत्रण मिळवलेल्या नदालपुढे त्याचा निभाव लागला नाही. अखेरच्या सेटमध्ये नदालने ३ चॅम्पियनशीप पॉइंट मिळवले. हे तिन्ही पॉइंट थिएमने वाचवले व सामना अतिरिक्त गेममध्ये नेत लढत रोमांचक नेली. परंतु, यावेळी नदालने जेतेपद अधिक लांबणार नाही याची काळजी घेत थिएमला चूक करण्यास भाग पाडले आणि निर्णायक गुणाची कमाई करत विक्रमी जेतेपदाला गवसणी घातली.  

वर्षं विजेताउपविजेता
2005राफेल नदालमारियानो पुएर्टा
2006राफेल नदालरॉजर फेडरर
2007राफेल नदालरॉजर फेडरर
2008राफेल नदालरॉजर फेडरर
2010राफेल नदालरॉबिन सोडरलिंग
2011राफेल नदालरॉबिन सोडरलिंग
2012   राफेल नदालनोवाक जोकोविच
2013    राफेल नदालडेव्हिड फेरर
2014    राफेल नदालनोवाक जोकोविच
2017    राफेल नदालस्टेन वावरिंका
2018राफेल नदालडोमिनिक थिएम

 

बार्बोरा-कॅटरीना दुहेरीत विजयीबार्बोरा क्रेजसिकोवा व कॅटरिना सिनियाकोवा या झेक प्रजासत्ताच्या सहाव्या जोडीने दमदार खेळ करताना महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी एरी होजुमी व माकोटो निनोमिया या जपानी जोडीचा यांचा ६-३, ६-३ असा केवळ ६५ मिनिटांत पराभव केला. दरम्यान ग्रँडस्लॅममध्ये जेतेपद पटकावणारी पहिली जपानी जोडी असा विक्रम रचण्यास एरी - माकोटो यांचा प्रयत्न होता. मात्र, बार्बोरा - कॅटरिना यांनी त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले.