जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू स्पेनच्या राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. त्याचबरोबर ग्रिगोर दिमित्रोव, एलिना स्वितोलिना यांनीही आपआपल्या सामन्यात बाजी मारताना विजयी आगेकूच केली.नदालने गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलो असल्याचे सिद्ध करताना बोस्निया आणि हेर्झेगोविनाच्या दामिर झुम्हूर याचा याचा केवळ एक तास ५० मिनिटांमध्ये ६-१, ६-३, ६-१ असा फडशा पाडला.पहिल्या सेटपासून राखलेला आक्रमक पवित्रा नदालने अखेरपर्यंत कायम राखला. नदालपुढे दामिरने क्वचितच आव्हान निर्माण केल. आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी नदालपुढे २४व्या मानांकीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्जमैन याचे कडवे आव्हान असेल.मेलबर्न : स्पर्धेत तिसरे मानांकन लाभलेल्या दिमित्रोवने तीव्र उष्णतेच्या वातावरणाशी झुंजताना आंद्रे रुबलेव याचे कडवे आव्हान ६-३, ४-६, ६-४, ६-४ असे परतावले. पुढच्या फेरीत त्याच्यापुढे आॅस्टेÑलियाच्या निक किर्गियोसचे तगडे आव्हान असेल. त्याचवेळी, दिमित्रोव उपांत्य फेरीत पोहचू शकला, तर त्याचा सामना नदालविरुद्ध होऊ शकतो. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्या किर्गियोसने फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड त्सोंग याचे आव्हान ७-६(७-५), ४-६, ७-६(८-६), ७-६(७-५) असे परतावले. किर्गियोसला विजयासह तीन सेट टायब्रेकपर्यंत खेळावे लागले.महिलांमध्ये चौथे मानांकन प्राप्त झालेल्या स्वितोलिना हिने १५ वर्षाच्या युवा खेळाडू मार्टा कोस्तयूक हिला ६-२, ६-२ असे एकतर्फी नमवले. विशेष म्हणजे १५ वर्षांच्या वयामध्ये आॅस्टेÑलियन ओपनमध्ये तिसरी फेरी गाठणारी मार्टा मार्टिना हिंगीसनंतरची दुसरी खेळाडू ठरली. पेट्रा मार्टिकने आपल्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करताना अंतिम १६ स्थानांमध्ये जागा निश्चित केली. तिने थायलंडच्या पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या लुकसिका कुमखुम हिला ६-३, ३-६, ७-५ असे पराजित केले. पहिल्या फेरीत दिग्गज व्हिनस विलियम्सला पराभूत करुन खळबळ माजवलेल्या स्वितझर्लंडच्या बेलिंडा बेंचिच हिला नमवून कुमखुम हिने लक्ष वेधले होते. तिने पेट्राविरुद्धही विजयाची संधी निर्माण केली होती, परंतु, मोक्याच्यावेळी तिच्याकडून चूका झाल्या.भारतीयांची आगेकूचभारताच्या दिविज शरण याने पुरुष दुहेरीत तिसरी फेरी गाठताना ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली. त्याचवेळी, रोहन बोपन्ना यानेही आपल्या साथीदारासह उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.शरण याने अमेरिकेच्या राजीव राम याच्यासह फॅबियो फोगनिनी - मार्सेल ग्रेनोलर्स यांना ४-६, ७-६(७-४), ६-२ असे नमवले. याआधी दिविज २०१३ साली अमेरिकन ओपनच्या तिसºया फेरीत पोहचला होता.दुसरीकडे बोपन्नाने फ्रान्सच्या एडुनार्ड रॉजर -वेस्सेलिन याच्यासह खेळताना जोआओ सौसा (पोर्तुगाल) - लियोनार्डो मायेर (अर्जेंटिना) या जोडीचा६-२, ७-६ असा पराभव केला.उष्णतेचा सामना करण्यासाठी तंदुरुस्त रहावे लागेल - फेडररआॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेदरम्यान खेळाडूंना भीषण उष्णतेला सामोरे जावेलागत आहे. यावर त्यांच्या खेळावर परिणाम होत असून या उष्णतेचा सामना करण्यासाठी खेळाडूंना खूप तंदुरुस्त रहावे लागेल, असा सल्ला गतविजेता आणि दिग्ग्ज टेनिसपटू रॉजर फेडरर याने दिला आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याने आॅस्टेÑलियातील वातावरण खूप तापले आहे. त्याचवेळी, शुक्रवारी पार ४२ डिग्रीच्या पुढे जाईल असा अंदाजही वर्तविण्यात आला होता. त्यामुळेच, कोर्टवर खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला.या उष्णतेचा परिणाम फेडररलाही झाला. त्याने म्हटले की, ‘जर तुम्ही अव्वल स्थानी येऊ इच्छिता, तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये खेळता आले पाहिजे.’ त्याचवेळी जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच याने या स्थितीला ‘अमानवीय’ ठरवताना म्हटले की, ‘सामन्यादरम्यान येथे श्वास घेणेही कठीण होत होते.’
‘राफा’चा दणदणीत विजयासह चौथ्या फेरीत प्रवेश, दिमित्रोव, स्वितोलिना यांचीही आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 3:49 AM