पर्थ : स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स यांच्यातील सामन्याने टेनिस प्रेमींना मंत्रमुग्ध केले. टेनिस चाहत्यांसाठी नव वर्षाची सुरुवात यापेक्षा चांगली होऊच शकत नाही. हॉपमॅन टेनिस चषक स्पर्धेत विद्यमान चॅम्पियन स्वीत्झर्लंडचा मिश्र दुहेरीचा संघ अमेरिकेविरुद्ध भिडणार आहे. पर्थमध्ये झालेला हा हॉपमॅन चषक शेवटचा होता आणि फेडरर व सेरना यांच्या सामन्यावरून अनेक जण उत्साहित होते. या दोघांना एकमेकांविरुद्ध खेळण्याची कल्पना टेनिस चाहत्यांना सुखावणारी आणि तितकीच उत्सुकतेची होती.
सेरेना आणि फेडररचे कोर्टवर आगमन होताच एकच जल्लोष झाला. या सामन्यात फेडरर बेलिंडा बेनसिचसह आणि सेरेना फ्रान्सेस टिएफोसह कोर्टवर उतरले होते. या दोघांचा एकमेकांविरुद्धचा खेळ पाहण्यासारखा होता. मात्र, फेडररने हा सामना 4-2, 4-3(3) असा जिंकून वर्षाची दणक्यात सुरुवात केली.