जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 37 लाख 47,504 इतका झाला आहे. आतापर्यंत 12 लाख 51,032 लोकं बरी झाली असली तरी 2 लाख 58,974 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे कार्यालये, शाळा बंद आहेत आणि अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं आहेत. शाळा बंद असल्यामुळे गरीब मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. जेवण मिळतं, म्हणून शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. पण, आता लॉकडाऊनमुळे शाळाच बंद असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेल आली आहे. अशा मुलांसाठी टेनिससम्राट रॉजर फेडरर धावला आहे.
Ashish Nehra ची टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. या व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे रोंजदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना धान्य पुरवले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सरकारी यंत्रणाही अपूरी पडत आहे. अशा गरजूंसाठी रॉजर फेडरर आणि त्याची पत्नी मिर्का मदतीसाठी पुढे आले होते. या दोघांनी स्वित्झर्लंडमधील गरजूंसाठी एक मिलियन स्वीस फ्रान्स ( 7 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला होता.
तेव्हा फेडरर म्हणाला होता की,'' ही तर फक्त सुरुवात आहे. गरजु कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणखी अनेक जण पुढे येतील, अशी आशा आहे. एकत्र येऊन आपण या परस्थितीवर मात करू शकतो. सुरक्षित राहा.'' बुधवारी रॉजर फेडरर फाऊंडेशननं आणखी एक घोषणा केली. फेडररच्या फाऊंडेशननं आणखी 7 कोटी रुपयांची मदत केली असून त्यातून आफ्रिकेतील 64 हजार गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोषक आहार देण्यात येणार आहे.
Shah Rukh Khan खरंच The Hundred लीगमध्ये गुंतवणूक करणार का? KKR कडून मोठी अपडेट
Corona Virus : औदासीन्य दूर करण्यासाठी इंग्लंड-पाकिस्तान मालिका खेळवा; माजी कर्णधाराची मागणी
Virat Kohli च्या 11 वर्षांच्या सोबत्याचे निधन; अनुष्का शर्मानं वाहिली श्रद्धांजली
Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार
जब मिल बैठेंगे तीन यार; बीअर पिण्यासाठी Ravi Shastri यांनी निवडले दोन क्रिकेटपटू
धक्कादायक : ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटूच्या Ex-Girlfriend ला अटक