पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने स्वीडनमधून पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा, अशी साद घातली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली. तरुण वर्गानं तिला डोक्यावर घेतलं. याच ग्रेटा थनबर्गनं आता तिचा मोर्चा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला टार्गेट केले आहे. 2017पासून थनबर्ग पर्यावरण रक्षणासाठी लढा देत आहे. तिनं तिचा मोर्चा फेडररकडे वळवला आहे. रॉजर फेडरर Credit Suisse या स्वित्झर्लंडमधील बँकेचा सदिच्छादूत आहे. ही बँक जीवाश्म इंधन तयार करणाऱ्या कंपनींना पैसा पुरवते. त्यामुळे थनबर्गनं फेडररवर टीका केली आहे.
रॉजर फेडरर जागा होss; ग्रेटाच्या टीकेनंतर 'टेनिस सम्राट' नेटिझन्सच्या निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 5:09 PM