लॉकडाऊनच्या काळात एकटेपणा घालवण्यासाठी इटलीच्या दोन मुलींनी एक शक्कल लढवली होती. ATPनं टेरेसवर टेनिस खेळणाऱ्या या मुलींचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्या रातोरात फेमसही झाल्या. 13 वर्षीय व्हिटोरीया आणि 11 वर्षीय कॅरोला यांचा व्हिडीओ पाहून दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर यांनी त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट दिलं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
कॅरोना आणि व्हिटोरीया यांचा टेरेसवर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ फेसबुकवर 1.3 मिलियन लोकांनी पाहिला आणि इंस्टाग्रामवर साडेचार लोकांनी तो व्हिडीओ पाहिला.
शिवाय, या मुलींना राफा नदाल अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी तो शिफारसही करणार आहे. या मुलींना राफा नदाल अकॅडमीमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी खुद्द फेडरर शब्द टाकणार आहे. आता रॉजरचा शब्द, त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी, पण तितकाच जवळचा मित्र राफा नदाल ऐकेलच. त्यामुळे व्हिटोरीया आणि कॅरोलासाठी जगातील सर्वोत्कृष्ट टेनिस अकॅडमीची दारं उघडली जाणार आहेत.
पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय?
So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल
इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!