शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

चुकलेल्या नियोजनामुळे नालेसफाईचे तेच रडगाणे 

By अजित मांडके | Published: June 24, 2024 6:29 AM

ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर येथील शहरांचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही.

ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी चांगल्या पद्धतीने नालेसफाई झाली आहे, असा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी तो फोलपणा आता समोर आला आहे. नालेसफाईचे नियोजन नसणे, चुकलेली नाले बांधणी, अरुंद झालेले नाले, नाल्यांचा बदलेला प्रवाह, नाल्याशेजारी झालेली बांधकामे आणि नागरिकांचा असहकार आणि ठेकेदारांकडून नालेसफाईच्या नावावर केल्या जात असलेल्या हात की सफाईमुळे नालेसफाईचे रडगाणे हे वर्षानुवर्षे सुरूच आहे. हे केवळ ठाण्यातच नाही, तर जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणीही असाच प्रकार असल्याने त्याचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे.

ठाणे किंवा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, मीरा भाईंदर येथील शहरांचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही. किंबहुना विकास आराखड्यानुसार ही शहरे वसलेली नाहीत. या शहरांना अनधिकृत बांधकामांचा विळखा पडलेला आहे. त्यातही पालिकेकडून केल्या जात असलेल्या कामांचे अयोग्य पद्धतीने नियोजन, काही निर्धारित मर्जीतील नागरिकांसाठी हव्या त्या पद्धतीने रस्त्यांची बांधणी, नाल्यांची बांधणी केली जात आहे. तसेच एखाद्याला नाल्याचा अडसर ठरत असल्यास त्या नाल्याचा प्रवाह बदलला जात आहे. मात्र, त्यावर पालिका काहीच हरकत घेत नाही. त्याचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. 

ठाणे महापालिका हद्दीत ३०८ मोठे, तर १२९ छोट्या नाल्यांचा समावेश आहे. दरवर्षी या नालेसफाईसाठी महापालिका ८ ते १० कोटी खर्च करते. परंतु, वरवरची नालेसफाई करून ठेकेदारही हात की सफाई करीत आहे. त्यातही नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचे पालिकेनेदेखील आता मान्य केले आहे. या नाल्यांची बांधणी करताना ती योग्य पद्धतीने झालेली नाही. काही ठिकाणी नाल्यांचा प्रवाह बदलला आहे, तर काही ठिकाणी नाला अरुंद करण्यात आला आहे, घोडबंदर भागात तर हे चित्र हमखास दिसते. या ठिकाणी नवनवीन गृहसंकुले होत असल्याने त्याठिकाणी नाल्यांचा ताप नको म्हणूनच असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जात आहे. शहरात इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने नाल्यांची चुकीच्या पद्धतीने बांधणी झालेली आहे. त्यातही सफासफाईच्या बाबतीत महापालिकेचा नियोजनशून्य कारभारही याला तितकाच जबाबदार आहे. मुंब्रा, दिव्याचा विचार केल्यास दिव्यात तर नाल्यांची बांधणी झालेलीच नाही.

उपाययोजना प्रत्यक्षात उतरतील?आयुक्तांनी यावर उपाय म्हणून नागरिकांशी संवाद साधण्याचे आवाहन प्रभाग स्तरावर सहायक आयुक्तांना दिले आहे त्यांच्याशी संवाद साधून जनजागृती करणे, नाल्यात कचरा टाकण्याऐवजी तोच कचरा घंटागाडीत टाकण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, यासाठी घंटागाड्यांच्या वेळा निश्चित करणे, नाल्यात कचरा पडणार नाही, यासाठी उपाययोजना करणे, आदी उपक्रम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, हे उपक्रम हाती घेतले जातील का? की हवेतच विरतील हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे