भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर भारतीय खेळाडूंनीही या निर्णयास पाठिंबा दिला. कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा संदेश भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावरुन देशवासीयांना दिला. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं मोदींच्या जनता कर्फ्यूवर मत व्यक्त केले आहे.
''कोरोनाच्या संसर्गाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊ न करायचा आहे. कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला हवे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या,'' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले होते.
हा जनता कर्फ्यूचा (जनतेतर्फे स्वयंस्फूर्त संचारबंदी) प्रयोग किती यशस्वी होतो, यावर पुढील पावले टाकता येतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून केलेल्या अतिशय भावनिक भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, ''गेल्या महिन्या - दीड महिन्यात १३0 कोटी भारतवासीयांनी ठामपणे कोरोनाचा सामना केला आहे. पण तेवढे पुरेसे नाही. त्यामुळे आपल्याला याहून अधिक सतर्क राहायला हवे. जागतिक महामारीच्या रूपाने पुढे आलेल्या कोरोनाच्या विषाणूंवर अद्याप औैषध सापडलेले नाही. त्यामुळे संकल्प व संयम पाळूनच आपणा सर्वांना मिळून कोरोनाला तोंड द्यायचे आहे.''
मोदींच्या या संकल्पनेवर सानिया मिर्झा म्हणाली,''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनात सहभागी होऊया आणि एकत्र येऊन या कोरोना व्हायरसशी मुकाबला करूया. कोरोना व्हायरसशी मुकाबला करून आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानूया. रविवारी जनता कर्फ्यूत सहभागी होऊया. जय हिंद.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार डेव्हिड वॉर्नरची लीगमधून माघार
'मोदीजी आपकी लिडरशीप काफी विस्फोटक है!', इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं ट्विट अन्...
OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह
Video : 'ती' सेल्फी घेण्यासाठी धावत आली अन् विराट कोहलीनं केलं असं काही
Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव
Corona मुळे क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा; इंग्लंडच्या खेळाडूला वाटतेय भीती