शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

शारीरिक थकव्यामुळे पूर्वीप्रमाणे उत्साहाने खेळणे शक्य नाही! सानिया मिर्झा निवृत्त हाेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 08:51 IST

३५ वर्षीय सानियाने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली आहेत.

मेलबर्न : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीत झालेल्या पराभवानंतर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ‘२०२२ सालचे सत्र आपले कारकिर्दीतील अखेरचे सत्र असेल,’ असे सांगत सानियाने निवृत्ती जाहीर केली. शारीरिक थकव्यामुळे पूर्वीप्रमाणे उत्साहाने खेळणे शक्य नसल्याचेही सानिया म्हणाली. ३५ वर्षीय सानियाने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली आहेत. यामध्ये तीन मिश्र दुहेरी गटाचे जेतेपदांचाही समावेश आहे. भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू म्हणून सानिया खेळापासून दूर होइल. महिला दुहेरीतील पहिला सामना गमावल्यानंतर सानियाने म्हटले की, ‘माझ्या निवृत्तीच्या निर्णयामागे अनेक कारण आहेत. मला आता सावरण्यास खूप वेळ लागेल याची मला जाणीव आहे. माझा मुलगा सध्या तीन वर्षांचा असून, त्याला सोबत घेऊन इतका प्रवास करणं त्याला संकटात टाकण्यासारखं असल्याचे मला वाटत आहे. दुर्दैवाने कोरोना महामारीमुळे आपल्याला नाईलाजाने स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबीयांच्या भल्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. शारीरिकदृष्ट्या आता मी कमजोर होत आहे. सामन्यादरम्यान मला गुडघादुखीचा त्रास झाला. यामुळे आम्ही हरलो असे मी म्हणणार नाही. पण आता यातून सावरण्यासाठी मला थोडा वेळ लागत आहे, कारण माझे वय वाढत आहे.’ मी या सत्राचा आनंद घेत आहे. पुनरागमन, तंदुरुस्ती, वजन कमी करण्यासाठी आणि सर्व मातांना एक मार्ग दाखविण्यासाठी मी मेहनत घेतली. बाळाला जन्म दिल्यानंतरही तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करु शकता हा विश्वास निर्माण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. आता या सत्रानंतर खेळण्यास माझे शरीर साथ देऊ शकेल याची खात्री नाही. - सानिया मिर्झापुरस्कार२००४ साली अर्जुन पुरस्कार२००६ साली पद्मश्री पुरस्कार२०१५ साली खेलरत्न पुरस्कारस्वित्झर्लंडची महान खेळाडू मार्टिना हिंगिससह सानियाची जोडी खूप यशस्वी ठरली होती. सानिया-हिंगीस यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.जागतिक एकेरी क्रमवारीत सानियाने अव्वल ३० स्थानांमध्ये झेप घेत कारकिर्दीत सर्वोत्तम २७ वे स्थान मिळवले. 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झा