भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा कोर्टवरच नव्हे तर सोशल मीडियावरही मनोरंजन करत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यानं सर्व खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. कुटुंबीयांना वेळ देण्यासोबतच हे खेळाडू सोशल मीडियावर सक्रीय राहत आहेत. टेनिसपटू सानियाही त्यापैकी एक आहे. आता सानियाचे TikTok व्हिडीओ व्हायरल होत आहे. 33 वर्षीय सानियानं अपलोड केलेल्या नव्या व्हिडीओत सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा करणाऱ्यांसाठी आहे.
सानियाच्या या व्हिडीओला 34000 व्ह्यू मिळाले आहेत. याआधीही सानियानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता.@mirzasaniar Nope .. not a morning person 😒🤣
♬ original sound - Krystle Dsouza
@mirzasaniar ##beautymode = ##Ramzaanmode 🤣😅
♬ CEO of beauty mode - markymarx
दरम्यान सानियानं सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविला आणि हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केल्यामुळे सानिया या पुरस्काराची मानकरी ठरली. सानियाला आशिया ओशियाना विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तिला एकूण १६९८५ पैकी १० हजारापेक्षा अधिक मते मिळाली. हा पुरस्कार चाहत्यांच्या मतांच्या आधारावर देण्यात येतो. यासाठी १ मे पासून मतदान सुरू झाले. सानियाला एकूण ६० टक्के मते मिळाली. फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविणारी पहिली भारतीय ठरणे अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय टेनिस महासंघाने व्यक्त केली. या पुरस्कारासाठी २ हजार डॉलर मिळतात. सानियाने ही रक्कम तेलंगण मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दान दिली.@mirzasaniar♬ original sound - Meet_037 😋
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला
'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक
सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट
वीरेंद्र सेहवागच्या प्रश्नांवर Sunny Leoneची जोरदार फटकेबाजी; दोघांनी केलेली एकत्रित कॉमेंट्री
बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव
कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत Rohit Sharmaचं महत्त्वाचं विधान
ट्वेंटी-20तील जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडणार? युवराज सिंगनं सांगितली दोन नावं