जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 43 लाख 43,251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 04,559 रुग्ण बरे झाले असले तरी 2 लाख 92, 913 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील रुग्णांचा आकडा 74480 इतका झाला आहे. त्यापैकी 24453 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 2415 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे देशातील लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याचे संकेत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लॉकडाऊनच्या या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अनेकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळत आहे.
बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव
कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तर रोज टिक टॉकवर नवीन व्हिडीओ अपलोड करताना पाहायला मिळत आहे. पण, सध्या सोशल मीडियावर Sania Mirza's trousers? असा एक टिक टॉक व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानियानंही हा व्हिडीओ शेअर केला आणि तिला तो पाहून हसू आवरले नाही. या व्हिडीओत एक ग्राहक दुकानदाराकडे सामानाची यादी देतो. त्यावर लिहिलेलं सामानांची नावं वाचताना दुकानदार सानिया मिर्झा ट्राऊझर असे वाचतो.... थोडा विचार केल्यानंतर त्याला हे समजतं की सानिया मिर्झा ट्राऊझर नाही, तर त्या ग्राहकाला सॅनिटायझर हवं असतं.
पाहा व्हिडीओ...
आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?
'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक