लासवेगास : टेनिस कोर्टवर झालेल्या वादामुळे चांगलीच चर्चेत आलेली अमेरिकेची स्टार खेळाडू सेरेना विल्यम्स हिने आठवडाभरानंतर एका कार्यक्रमात मत मांडले. ती स्वत:चा फॅशन व्यवसाय आणि कुटुंबाविषयी भरभरून बोलली; पण टेनिसमधील घटनेबाबत तिने मौन पाळणे पसंत केले.२३ वेळेची ग्रँडस्लॅम विजेती सेरेना तब्बल २५ मिनिटे स्टेजवर होती. खेळातील समानता आणि यूएस ओपनमधील चेअर अंपायरसोबत घडलेल्या प्रकारावर तिने शब्दही काढला नाही. कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांना याबाबत प्रश्न विचारण्याचीही परवानगी नव्हती. यूएस ओपन फायनलमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाकडून पराभूत झाल्यानंतर पंचासोबत हुज्जत घालणे तसेच रॅकेट आपटल्याप्रकरणी पुरुष खेळाडूंच्या तुलनेत आपल्याला कठोर वागणूक दिल्याचा सेरेनाचा आरोप होता. याप्रकरणी तिला १७ हजार डॉलर दंड भरावा लागला.
सेरेना बोलली; पण फॅशनवर... टेनिसवर मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:30 PM