लंडन : ग्रीसच्या स्टीफानोस सिटसिपास याने धमाकेदार खेळ करताना ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमला अत्यंत रोमांचक लढतीत नमविले. या शानदार विजयासह सिटसिपासने कारकिर्दीत पहिल्यांदाच एटीपी फायनल्स स्पर्धेचे जेतेपद उंचावले.अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात २१ वर्षीय सिटसिपासने थिएमचे कडवे आव्हान ६-७, ६-२, ७-६ असे परतावले. यासह सिटसिपास आॅस्टेÑलियाच्या लेटन ह्युइटनंतरचा सर्वात युवा टेनिसपटू ठरला. यंदाच्या मोसमात सिटसिपासने तिसरे जेतेपद पटकावले. याआधी त्याने मिलान येथे नेक्स्ट जेन एटीपी फायनल्स स्पर्धाही जिंकली होती. (वृत्तसंस्था)स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिटसिपासने सहा वेळचा विजेता दिग्गज रॉजर फेडररला सरळ दोन सेटमध्ये नमवत दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. येथे त्याची लढत थिएमविरुद्ध होती.अंतिम सामन्यात दोघांनी तोडीस तोड खेळ करत सामन्यात कमालीचे रंग भरले. पहिला सेट गमावल्यानंतर सिटसिपास दबाखाली होता. मात्र त्याने लवकरच स्वत:ला सावरत सलग दोन सेट जिंकत दिमाखात बाजी मारली.
सिटसिपास ठरला ‘चॅम्पियन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:19 AM